Husband beaten by Wife: विवाहबाह्य संबंधांमुळे नात्यामध्ये दरी निर्माण होते. त्यामुळे भांडणं होऊ शकतात. अन् अखेर एकेदिवशी ते नातं संपून जातं. त्यामुळे नवरा-बायकोच्या नात्यामध्ये प्रामाणिकपणा हवा असा सल्ला जेष्ठ मंडळी देतात. मात्र तरी देखील काही मंडळी ऐकत नाहीत. अशाच एका पुरुषाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. पत्नीच्या नकळत तो त्याच्याच ऑफिसमधल्या एका महिलेला डेट करत होता. पण हुशार बायकोनं थेट ऑफिस गाठून नवऱ्याला रंगेहात पकडलं. एवढचं नाहीतर ऑफिसमध्ये त्याची चपलेने धुलाई करत घरापर्यंत त्याला बदडत आणलं आहे.या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नवऱ्याला चपलेने काढलं बदडून

Lakhat Ek Aamcha dada
Video: तेजूच्या लग्नाची सुपारी फुटली; डॅडी म्हणाले, “खरे नवरदेव…”, पाहा प्रोमो
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
sarpanch viral video | Wife caught husband with girlfriend
सरपंचाचं लफडं बायकोनं पकडलं; नवऱ्याबरोबर कारमधून फिरणाऱ्या गर्लफ्रेंडची केली अशी अवस्था की…; VIDEO झाला व्हायरल
The young man holding paati wrote funny message
“सुंदर बायको भेटायला नशीब नाही, तर..” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO होतोय व्हायरल
Sarpanch husband caught cheating on his wife with girlfriend wife beats girlfriend video viral mp
आधी ड्रेस खेचला मग बुक्क्यांनी मारलं! सरपंच पतीला गर्लफ्रेंडबरोबर पाहून पत्नीने घातला राडा, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं
bhagare guruji son Akhilesh bhagare will get marriage anagha atul share video
भगरे गुरुजींचा मुलगा लवकरच अडकणार लग्नबंधनात; लेकीने लग्नघराचा व्हिडीओ केला शेअर
hotel Photo Viral
बायकोला वैतागलेल्या नवऱ्यांसाठी खास ठिकाण! हॉटेलच्या नावाची पाटी वाचून चक्रावले नेटकरी, पाहा Viral Photo

हे प्रकरण बिहारच्या औरंगाबादमधलं असल्याचं समोर आलं आहे. या महिलेचा नवरा इंजिनिअर असून नेहमीप्रमाणे आपल्या ऑफिसमध्ये बसून तो काम करत होता. यावेळी, एक महिला ऑफिसमध्ये दाखल होते आणि त्यांच्यावर अक्षरश: तुटून पडते. महिला जेव्हा चप्पल हातात घेऊन अधिकाऱ्याला मारहाण करु लागते तेव्हा कार्यालयातील सगळेच आश्चर्याने पाहत उभे राहतात. सुरुवातीला उपस्थित कुणालाच हा प्रकार काय आहे हे कळत नाही. मात्र नंतर ही महिला या इंजिनिअरची बायको असल्याचं सगळ्यांना समजतं. महिलेने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, तिच्या नवऱ्याचे त्यांच्या ऑफिसमधील एका महिला अधिकाऱ्याशी प्रेमसंबंध आहेत.

हेही वाचा – उशीखाली लपलेला किंग कोब्रा; तरुण बिछान्यावर झोपताच फना काढला अन्…, थरारक VIDEO VIRAL

तिने आरोप केला की तिचा नवरा त्याच्या विवाहबाह्य संबध असणाऱ्या मुलीवर पैसे वाया घालवत आहे. तसेच तिला आणि तिच्या मुलांना आर्थिक पाठबळही तो देत नाहीये. पत्नीनेच नाहीतर त्यांच्या मुलांनीही वडिलांवर वेगवेगळे आरोप यावेळी केले आहेत. या घटनेबद्दल बोलताना, महिलेने सांगितले की ती गेल्या वर्षभरापासून तिच्या माहेरी राहत आहे. या दरम्यान तिचा नवरा तिला आणि तिच्या मुलांना एक रुपयाही देत नाहीये. त्याच्या या वागण्याला वैतागून तिने थेट ऑफिस गाठल्याचं ती सांगते.

नेटकरीही संतापले

शिवाय या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर देखील शेअर केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील भडकले आहेत. त्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करत आहेत.