Woman beats young man viral video: सध्या जगभरातच चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. दिवसाढवळ्या चोर लोकांच्या घरात घुसून चोरी करत आहेत; तर कधी रेल्वेमध्ये पाकीटमार, फोन चोरण्याच्या चोरांची दहशत वाढू लागली आहे.
फोन चोरीच्या घटनांशी संबंधित असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहत असतो. सध्या अशीच घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. या धक्कादायक घटनेत, उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये महिलेचा मोबाइल फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली एका तरुणाला अर्धनग्न अवस्थेत महिला आणि स्थानिकांनी बेदम मारहाण केली. गर्दीच्या बाजारपेठेत तरुणाने महिलेचा फोन हिसकावून घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने आरोपीला पकडल्यानंतर त्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीला मारहाण करण्यात महिलाही सामील झाली आणि त्याला मारहाण करत राहिली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये महिला आरोपीच्या केसांना पकडून बुक्क्याने त्याला मारहाण करत आहे, तसंच आजूबाजूला जमलेली गर्दीही त्या तरुणावर हात साफ करताना दिसतेय. त्याच्या पाठीवर बुक्क्यांनी, त्याला लाथ मारून तर तोंडावर चापट मारून घटनास्थळी उपस्थित असलेल्या सगळ्यांनीच त्याला चांगलाच चोप दिलेला या व्हिडीओमध्ये दिसतोय. यादरम्यान, आरोपी महिलेला मारहाण थांबवण्याची विनंती करताना आणि आपल्या कृत्याबद्दल माफीही मागताना दिसत आहे. “मॅडम, तुम्ही मला किती माराल… माझ्याकडून चूक झाली आहे.” असं आरोपी म्हणताना दिसत आहे. परंतु, महिला आणि जमाव न थांबता तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत.
ही महिला खरेदीसाठी बाजारात आली होती, त्यानंतर आरोपीने तिचा मोबाइल हिसकावून घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. जमावाने तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बेगमपुलजवळ ही घटना घडली. आरोपीचे नाव अरमान असे आहे.
हा व्हिडीओ @ManojSh28986262 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “महिलेच्या शौर्याला सलाम” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या संतप्त प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “गरीब मध्यमवर्ग काबाडकष्ट करून पैसे कमावत असतात आणि हे दुष्ट चोर सामान्य माणसांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यात व्यस्त असतात. अशा प्रत्येक चोराला पकडून चांगलेच मारले पाहिजे.” तर एकाने “सशक्त महिला, सक्षम उत्तर प्रदेश” अशी कमेंट केली.