परिक्षेत पास होण्यासाठी अनेकांनी शिक्षकांचे पाय पकडल्याचे तुम्ही पाहिले असेल, पण बॉस परिक्षा आहे, आयुष्याचा, करिअरचा सवाल आहे. अशा वेळी शिक्षकांचे नाही तर कोणाचे पाय धरणार? असेही प्रश्न विचारणारे आहेतच की. हा झाला गंमतीचा भाग. परिक्षेत पास होण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. मग ती परिक्षा कोणतीही का असेना.. कोणी कॉपी करेल, कोणी शिक्षकांना लाच देऊ पाहिल तर कोणी आणखी काय करले पण परिक्षेत पास करण्यासाठी जोरजोरात रडताना कोणाला पाहिले आहेत का? नाही ना? मग या महिलेला नक्की भेटा. ड्रायव्हिंग टेस्टमध्ये ती नापास झाली, म्हणून तिला लायसन्स देण्यास वाहतूक पोलिसांनी नकार दिला. बिचारीला एवढं वाईट वाटलं की रस्त्यातच ती हमसून हमसून रडायला लागली. एवढंच नाही तर मला पास करा नाहीतर माझ्या मैत्रिणींना मी तोंड दाखवू शकत नाही असे पोलिसांना इमोशनल ब्लॅकमेल केले ते वेगळे.
वाचा : ब्राझीलच्या अध्यक्षांना भुताचं भ्या !
चीनमधल्या हेनन प्रांतात हा प्रकार घडला. ही महिला ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी आली होती. पण गाडी चालवताना मात्र कधी ब्रेक मारायचा हेच तिला समजत नव्हतं, त्यामुळे यात काही ती पास झाली नाही. हिला ड्रायव्हींग लायसन्स दिले तर ती नक्कीच कोणाचातरी जीव घेईल म्हणून तिला काही लायसन्स द्यायला पोलीस तयार नव्हते. तेव्हा पोलिसांसमोरच तिने जोरजोरात रडायाला सुरूवात केली. मला लायसन्स दिले नाही तर माझ्या मित्र मैत्रिणींना मी तोंड दाखवू शकणार नाही असे म्हणत ती जोरजोरात रडत होती. शेवटी पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना बोलावून घेतले आणि तिला घरी नेण्यास सांगितले.
वाचा : शेळ्या-मेंढ्या कापत गावकऱ्यांनी बिबट्याला जगवलं