Woman booked for assaulting father-in-law: मंगळुरूमधून सून आणि सासऱ्यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका महिलेनं तिच्या ८७ वर्षीय सासऱ्याला काठीने मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सासू आणि सूनेचं नातं हे बाप-लेकीसारखं असतं असं सगळेच म्हणतात मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. कारण आपल्याच वृद्ध सासऱ्यांना ही महिला अमानुषपणे मारहाण करत आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून सोशल मीडियावरही संतापाची लाट उसळली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ही घटना ९ मार्च रोजी कंकनडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुळशेकर येथे घडली आहे. आरोपी महिला कॅशियर म्हणून काम करते, तर तिचा नवरा हा कामानिमित्त दुबईत असतो. घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अत्याचाराची ही घटना कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही महिला आपल्या सासऱ्याला काठीने मारत आहे आणि नंतर त्याला धक्का देत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंगळुरू पोलिसांनी कर्नाटक वीज मंडळात काम करणाऱ्या उमाशंकरी नावाच्या महिलेला अटक केली आहे. या घटनेची माहिती देताना मंगळुरूचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त दिनेश यांनी सांगितले की, सोमवारी कनकनडी पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की, उमाशंकरी नावाच्या महिलेने तिचे सासरे पद्मनाभ सुवर्णा यांना कुलशेखर परिसरात काठीने मारहाण केली आहे. त्यानंतर घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी महिलेला अटक केली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “बाबा, माझ्या मुलांची काळजी घ्या” आत्महत्येपूर्वी व्हिडीओ बनवत तरुणानं गंगेत मारली उडी; हृदयद्रावक घटना व्हायरल

वृद्ध सासऱ्यांना काठीने जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आणि छळ केल्याचा आरोप महिलेवर केला आहे.यानंतर आरोपी महिलेवर आयपीसी कलम ३२४ आणि ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेला न्यायालयात हजर करण्यात आले तेथून तिला कारागृहात पाठवण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.  सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.