जगभरात प्राणी प्रेमींची कमी नाही. यामुळे लोक पाळीव प्राण्यांमध्ये केवळ कुत्रा, मांजरच नाही तर साप, वाघ, सिंह आणि इतर धोकादायक प्राणीदेखील पाळतात. पण, एका महिलेने चक्क मोराला पाळल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या महिलेने विमानात मोराला मांडीवर घेऊन प्रवास केला. होय हे थोडं विचित्र वाटेल, पण सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला विमानात मोराला घेऊन जाताना दिसत आहे. एखाद्या लहान मुलाला उचवावे तसे तिने मोराला हातात पकडले आहे. यानंतर ती मोरासह सीटवर येऊन बसते. तिने मोराला मांडीवर ठेवत त्याचे पंख खाली सोडले आहेत. हा व्हिडीओ २०२२ चा आहे, जो पुन्हा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओवर आता अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे; तर अनेकांनी मोराच्या सौंदर्याची प्रशंसा केली आहे.

सरकारने इकडेही लक्ष द्या! गळक्या छताखाली भरतेय शाळा; विद्यार्थ्यांवर आली वर्गात छत्री घेऊन बसण्याची वेळ; पाहा Video


हा व्हिडीओ ‘वाइल्ड कंटेंट’ (@NoCapFights) नावाच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की- विमानात मोर का आणला आहे? हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच काहींनी या प्राण्याच्या सुरक्षेबाबत भीती व्यक्त केली आहे, तर अनेकांनी याला विमान कंपनीचा निष्काळजीपणा म्हटले आहे. एका यूजरने लिहिले की, पैसा असेल तर काहीही होऊ शकते; तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, पक्ष्याला जागा मिळाली असती का? बरं, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे, आम्हाला कमेंट करून कळवा