जगात प्रत्येकाची स्वत:चे एक तरी घर असावे अशी इच्छा असते. यात अनेकांनी काही वर्षांपूर्वी काही हजारोंना खरेदी केलेल्या घराची किंमत आता काही कोटींवर येऊन पोहचली आहे. पण प्रत्येकाचे नशीब मेरेडिथ टॅबॉन नावाच्या महिलेसारखे नसते, जिने अवघ्या १०० रुपयांना विकत घेतलेल्या घराचे बाजारमूल्य आता ४ कोटींच्या पुढे गेले आहे.

एका रिपोर्टनुसार, मेरेडिथ टॅबोनने सिसिलीमध्ये इटालियन सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या ‘वन युरो होम योजने’बद्दल ऐकले होते. ज्यामध्ये तिने केवळ १ युरो म्हणजेच ९० रुपयांमध्ये घर खरेदी केले होते. पण गेल्या अनेक वर्षांपासून ते घर रिकामी होते, तिथे कोणीही राहत नव्हते. पण हे घर खरेदी केल्यानंतर महिलेने अशी कशी काही जादूची कांडी फिरवली की ज्यामुळे काही रुपयांना विकत घेतलेल्या या घराची किंमत आता करोडोंच्यावर पोहचली आहे.

Arvind Kejriwal
Delhi : महाराष्ट्रात भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ‘या’ केंद्रशासित प्रदेशात राबवणार लाडकी बहीण योजना; नावनोंदणीही सुरू!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
in Mumbai 55 percent increase in price of affordable homes
मुंबई महानगरातील परवडणाऱ्या घरांच्या किमतीत ५५ टक्के वाढ!
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
murder of Satish Wagh, Satish Wagh, dispute,
सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
issue of ministery post between Devendra Fadnavis Eknath Shinde and Ajit Pawar is likely to be resolved in Delhi
खातेवाटपाचा पेच आता दिल्लीतच सुटण्याची शक्यता
Panvel Virar House expensive , House expensive Panvel,
पाच वर्षात पनवेल, विरारची घरे महागली; दोन्ही ठिकाणच्या किमतीत ५८ टक्क्यांनी वाढ

काही वर्षांपूर्वी अवघ्या ९० रुपयांना विकत घेतले घर

मेरेडिथ टॅबोन या महिलेने २०१९ मध्ये इटलीच्या दुर्गम भागात असलेल्या सिसिली येथे एका लिलावाबद्दल ऐकले, ज्याची बोली अवघ्या ९० रुपयांपासून म्हणजे एक युरोपासून सुरू होती. ही मालमत्ता १६०० साली बांधली गेली होती. ज्यामुळे तिथे वीज, पाणी अशा कोणत्याच सुविधा नव्हत्या .बेसमेंच्या वर बांधलेला तो एक मोठा हॉल होता. ज्याचे छप्पर खूप जाड आणि मजबूत होते. हे घर ज्या गावात होते तिथे मेरेडिथचे पणजोबा राहत होते. मेरेडिथने विकत घेतलेल्या घराच्या रिनोव्हेशनसाठी नंतर ४ लाखांची बोली लावली. ती आता शिकागोमध्ये राहात असली तरी तिने ते घर रिनोव्हेशन करण्याचा निर्णय घेतला.

Kedarnath Dham: केदारनाथ यात्रेला जाताय? मग ‘या’ अद्भूत ठिकाणांना आवर्जून भेट देऊ शकता

रिनोव्हेशनमुळे बदलला सारा गेम

मेरेडिथकडे आता इटालियन नागरिकत्व आहे, त्यामुळे तिचे काम अजूनचं सोप्पे झाले. तिने विकत घेतल्या घराशेजारी असलेले घरही तिने २७ लाख रुपयांना विकत घेतले आणि हे दोन्ही एकत्र करून तिला जवळपास ३००० चौरस फूट जागा मिळाली. २ वर्षांच्या मेहनतीनंतर एक क्रिएटिव्ह प्रोजेक्ट तयार केला. यासाठी तिने २ कोटी १४ लाख रुपये गुंतवून करून तिने ४ बेडरुम असलेले एक अलिशान हॉलिडे होम बनवले. या अलिशान घरात तिने ४ बाथरूम, आउटडोर किचन, लिव्हिंग रूम आणि डायनिंग एरिया देखील तयार केला आहे. या घराबाबत ती सांगते की, ९० रुपयांच्या घरावर तिने २ कोटी ३५ लाख रुपये खर्च केले, ज्याची किंमत आता तब्बल ४ कोटी १० लाख रुपये झाली आहे.

Story img Loader