आपल्या मुलांनी यशस्वी व्हावे अशी सर्व पालकांची इच्छा असते. यामध्ये त्यांच्या पालकांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. आपल्या मुलांनी यशस्वी होऊन आपले नाव प्रसिद्ध करावे अशी सर्वच पालकांची इच्छा असते. आपल्या मुलांना यशस्वी होताना पाहून स्वप्न पूर्ण करताना पाहणे हा पालकांसाठी अभिमानाचा क्षण असतो. जेव्हा ते त्यांच्या मोठ्या झालेल्या मुलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी उत्तम कामगिरी करताना पाहतात. तेव्हा त्यांना आणखीनच अभिमान वाटतो. दरम्यान स्पाइसजेटसाठी केबिन क्रू म्हणून काम करणाऱ्या एका मुलीचा आणि तिच्या आई-वडिलांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल लेक असावी तर अशी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्पाइसजेट विमानात केबिन क्रू म्हणून काम करणाऱ्या एका मुलीने तिच्या आई वडिलांचा विमानातील विमान प्रवासाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. अस्मिता नावाच्या महिलेने काही दिवसांपूर्वी @airhostess_jaatni नावाच्या तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला होता आणि त्याला ८.९ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. “POV- तुमची मुलगी एअरहोस्टेस आहे,” व्हिडिओला तिने असं कॅप्शन लिहलं आहे. या व्हिडीओमध्ये या तरुणीचे पालक फ्लाइटमध्ये चढताना दिसत आहेत आणि ती त्यांना त्यांचे सीट नंबर सांगण्यासाठी तिकीट तपासते. समोरच्या रांगेत बसलेल्या दोघांनाही आपल्या मुलीचा अभिमान वाटतो. “आणि व्हीआयपी पॅक्स ऑनबोर्ड, विशेष भावना,” तिने कॅप्शन म्हणून लिहिले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: सासू असावी तर अशी! सासूने किडनी देऊन सुनेला दिले जीवदान, कुटुंबियांनी केले जंगी स्वागत

हा व्हिडीओ पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत. अनेक मुलं असतात जे आपल्या पालकांच्या कष्टाचं चीज करतात आणि त्यांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करतात. आतापर्यंत हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे तर अनेकांनी तो लाईक केला आहे. तर या व्हिडिओने अनेक नेटकरी भावूक झाले आहेत. एका वापरकर्त्याने लिहले आहे की, मी आज इंटरनेटवर पाहिलेला हा सर्वात चांगला आणि हृदयस्पर्शी व्हिडीओ असल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman cabin crew member posts video welcomes her parents on flight viral video melts hearts netizens love it video viral on social media srk