Snake Climbed On Woman Lying Down : साप म्हटलं तरी मोठ्या माणसांनाही घाम फुटतो. असा साप प्रत्यक्षात समोर दिसला की थरकाप उडतो. विचार करा कुणी गाढ झोपेत असेल आणि एक भलामोठा कोब्रा अंगावर आला तर काय होईल? असाच एक धडकी भरवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एका कोब्रा सापाने गाढ झोपलेल्या महिलेची झोपच उडवली आहे. गाढ झोपेत असलेल्या महिलेच्या अंगावर हा कोब्रा चढलेला पाहून अक्षरशः अंगावर काटा येतो.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ग्रामीण भागात एक महिला तिच्या जनावरांजवळ खाटेवर निवांत पडलेली दिसत आहे. कोब्रा साप त्या महिलेच्या अंगावर चढून फणा काढलेला दिसत आहे. आपल्या अंगावर फणा काढून बसलेला साप पाहून महिला घाबरून गेली. भीतीपोटी महिलेची अवस्था खूपच खराब झाली होती. पण महिलेने धीर न सोडता ही महिला आरामात जशी झोपली होती तशीच पडून राहिली. ज्याने हे दृश्य पाहिले तो थक्क होऊ लागला.
आणखी वाचा : कोरियन आईने मुलाला भारतीय राष्ट्रगीत शिकवले, गोंडस मुलाने कसं गायलं “जन-गण-मन…”, पाहा VIRAL VIDEO
हा व्हिडीओ कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्य़ातील असल्याचे सांगितले जात असून, यामध्ये एका महिलेच्या अंगावर कोब्रा बसलेला दिसत आहे. असं म्हणतात की जेव्हा मृत्यू डोक्यावर स्वार होतो तेव्हा भल्याभल्यांचे धाडस तोडीस तोड उत्तर देते. पण या व्हायरल व्हिडीओतील महिलेचे धाडस पाहून तुम्हीही तिचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आंब्याच्या झाडाखाली एक खाट ठेवली आहे, ज्यावर एक महिला एका अंगावर झोपलेली आहे. झोपडीच्या शेजारी एक लहान गायीची गाय खुंट्यात बांधली आहे.
आणखी वाचा : Dosa Printer: कधी विचार केला होता का? ‘डोसा प्रिंटर’ही येईल, VIRAL VIDEO पाहून लोक थक्क झाले
महिलेने डुलकी घेताच एक कोब्रा साप हळू हळू तिच्या पाठीवर चढतो. कोब्रा अंगावर चढताच महिलेचे डोळे उघडतात. दरम्यान, महिला शरीर न हलवता देवाचे स्मरण करताना दिसत आहे. महिलेला धोका लक्षात आला, मात्र अशा परिस्थितीतही महिला धीराने कोणतीही हालचाल न करता आवाज काढत आहे आणि साप आपल्यापासून दूर जाण्याची वाट पाहत आहे. महिलेची कोणतीही हालचाल होत नसल्याचं पाहून साप काही मिनिटांनंतर कोणतीही इजा न करता तिथून निघून गेला. त्यानंतर या महिलेच्या जीवात जीव आला. या प्रसंगी एक छोटीशी चूक सुद्धा महिलेच्या जीवावर बेतू शकली असतील. पण सुदैवाने असं काहीच घडलं नाही.
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : ‘काला चष्मा’ या हिट गाण्यावर आफ्रिकन मुलांनी केला डान्स, VIRAL VIDEO पाहून तुम्हीही त्यांचे फॅन व्हाल!
हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘जेव्हा असे होईल तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असेल? या व्हिडीओला आतापर्यंत ३५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लोकांनी लाइक केले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. साप स्वतःहून आल्यानंतरही महिला शांत असल्याचे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. काही युजर्सनी त्या महिलेचे धाडसी वर्णन केले आहे, तर एका युजरने म्हटलंय की, जर त्याच्यावर ती अशा परिस्थितीत आली तर त्याचा हृदयविकाराच्या झटक्यानेच मृत्यू होईल.