McDonalds Coffee Cup Contained Dead Mouse : कॅफे, रेस्टॉरंट्समध्ये किमान चांगले आणि स्वच्छ अन्नपदार्थ मिळावेत, अशी अपेक्षा असते. मात्र, एका कॅफेमधून कॉफी ऑर्डर करणाऱ्या महिला ग्राहकाला एक धक्कादायक अनुभव आला आहे. या महिलेला कॉफी कपाच्या तळाशी चक्क मेलेला उंदीर आढळला आहे. ही घटना कॅनडातील रेजिनामधील मॅकडोनाल्ड कॉफीमध्ये घडली असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

महिलेने दावा केला की, तिने मॅकडोनाल्ड कॅफेमधून एक कॉफी ऑर्डर केली आणि ती प्यायली. संपूर्ण कॉफी पिऊन झाल्यानंतर तिला कॉफी कपाच्या तळाशी एक मेलेला उंदीर सापडला आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर, अनेक जण रेस्टॉरंटवाले लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप करीत आहेत.

Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
three cheetahs attack the fox
‘तिघांच्या तावडीतून तो सटकला…’, तीन चित्त्यांचा कोल्ह्यावर हल्ला; थरारक VIDEO पाहून व्हाल शॉक
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
People caught the leopard in bihar shocking video goes viral on social media
अरे जरा तरी दया दाखवा रे! बिबट्याचे दोन्ही पाय पकडले, गळा दाबला अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?
The hyena pulled the lion's tail
“एखाद्याच्या संयमाचा अंत पाहू नका”, तरस प्राण्यानं डिवचलं म्हणून सिंह चवताळला, पुढे असं काही घडलं… VIDEO पाहून उडेल थरकाप

“टायटॅनिक आज बुडाले असते तर…?” आनंद महिंद्रांची विचार करायला लावणारी पोस्ट; युजर्स म्हणाले, “गुलाम बनत…”

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला हातात कॉफी कप घेऊन आहे. यावेळी कॉफीच्या कपाच्या तळाशी एक छोटा मेलेला उंदीर दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल साईट्सवर वेगाने व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ Just Bins Regina नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता. त्याशिवाय हा व्हिडीओ एक्सवरही शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कॉफीचा रिकामा कप दिसत आहे; ज्याच्या तळाशी थोडीशी कॉफी शिल्लक आहे आणि कपामध्ये एक मेलेला उंदीर दिसत आहे. मागून एका महिलेचा आवाज येत आहे; जी या घटनेबद्दलची माहिती देत आहे.

हा व्हिडीओवर हजारोंनी कमेंट्स केल्या आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिलेय, “उंदीर पाहिल्यानंतर मी पूर्णपणे मरेन.” दुसऱ्याने लिहिलेय, “हे पाहून मला उलटी होईल.” त्याचबरोबर काही लोक ही संपूर्ण घटना बनावट असल्याचे म्हणत आहेत. एका युजरने लिहिले, “मॅकडोनाल्डच्या एका माजी कर्मचाऱ्याने सांगितले की, ज्या नोझलमधून कॉफी येते ते इतके लहान आहे की, त्यात उंदीर बसू शकत नाही. तिने एखादा कीटक टाकला असता, तर ते अधिक विश्वासार्ह झाले असते. हे बनावट आहे.”

Story img Loader