A woman claimed a Zomato agent ‘abused’ her staff over a 10-minute delay : एक महिलेने दावा केला आहे की झोमॅटो डिलिव्हरी बॉयकडून ऑर्डर घेण्यासाठी १० मिनिटे उशीर केल्याने त्याने तिच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली आहे. या घडनेबाबत जेव्हा या महिलेने सोशल मीडियावर शेअर केले नेटकऱ्यांनी या महिलेलाच ट्रोल केले.

सोशल मीडिया वापरकर्त्यांनी डिलव्हरी बॉयच्या चुकीच्या वर्तनाचे समर्थन केले नाही पण महिलेने ऑर्डर घेण्यासाठी उशीर केल्यामुळे डिलव्हरी बॉयच्या रोजच्या कामावर कसा परिणाम होऊ शकतो. हे X वरील एका पोस्टमध्ये राधिका बजाजने डिलव्हरी बॉयच्या वर्तनासाठी डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato आणि त्याचे CEO, दीपंदर गोयल यांना टॅग केले.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Gwalior PWD Employee Molests Girl Video Viral
VIDEO : नोकरीच्या बहाण्याने रेस्ट रुममध्ये बोलावणाऱ्या उपअभियंत्याला तरुणीने दिला चपलेचा प्रसाद; बघा कशी केली पोलखोल
Fraud of Rs 42 lakhs through social media Navi Mumbai crime news
नवी मुंबई: समाजमाध्यमाद्वारे ४२ लाखांची फसवणूक
Alia Bhatt
आलियाची लेक राहा कपूर आजीला कोणत्या नावाने मारते हाक? सोनी राजदान म्हणाल्या…
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत

“ऑर्डर मिळण्यास १० मिनिटे उशीर झाल्यामुळे ‘या’ झोमॅटो डिलिव्हरी बॉयने ऑर्डर घेण्यासाठी गेलेल्या माझ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. झोमॅटो, तुम्ही डिलिव्हरी बॉईजचे वर्तन सुधारण्यावर लक्ष का देत नाही,” असे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

बजाज पुढे म्हणाले की, ती अॅपचा ऑर्डरचा मागोवा घेत होती आणि ऑर्डर घेण्यासाठी एका कर्मचाऱ्याला सांगितले होते. डिलिव्हरी एजंट अपेक्षेपेक्षा लवकर पोहोचला आणि त्यामुळे ऑर्डर घेण्यासाठी १० मिनिटांच्या उशीर झाल्यामुळे त्याने शिवीगाळ केली.

झोमॅटोने त्वरीत पोस्टवर प्रतिक्रिया दिली आणि घटनेबद्दल माफी मागितली.

“हाय राधिका, डिलिव्हरी पार्टनरच्या अपमानास्पद वागणुकीबद्दल आम्ही मनापासून माफी मागतो. हे स्वीकारार्ह नाही आणि आम्ही ते गांभीर्याने हाताळण्यासाठी वचनबद्ध आहोत. कृपया खात्री बाळगा, आम्ही या प्रकरणाचा शोध घेत आहोत आणि लवकरच अपडेटसह तुमच्यापर्यंत पोहोचू,” कंपनीने म्हटले आहे.

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मने याबद्दल माफी मागितली असताना चूक कोणाची आहे यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. अनेक वापरकर्ते डिलिव्हरी एजंटच्या बचावासाठी आले कारण त्यांनी नमूद केले की,”वेळेवर डिलिव्हरी करणे डिलिव्हरी बॉयच्या कामाचा एक महत्त्वाचा भाग आहे.”

हेही वाचा –“चिंची चेटकीण आली फ्रिजमध्ये”, लेकीला अद्दल घडवण्यासाठी आईने लढवली शक्कल, Viral Video पाहून पोट धरून हसाल

“१० मिनिटांचा उशीर कमी आहे का? त्यांना पुढची ऑर्डरा नाही द्यायची का? दुसऱ्यांच्या वेळेची कदर करा मॅडम”असे एका वापरकर्त्याने म्हटले.

दुसरा वापरकर्ता पुढे म्हणाला, “हाय झोमॅटो, कृपया डिलिव्हरी एजंटवर कारवाई करू नका. फक्त त्यांना चांगल्या पद्धतीने वागण्यास सांगा.”

हेही वाचा –“Arranged Marriage असं गाजवा की लोकांना Love Marriage वाटलं पाहिजे!”, हळद लागताच नवरा-नवरीने केला भन्नाट डान्स, Video Viral

अनेक वापरकर्त्यांनी विलंब झाल्यास टिप देण्याच्या महत्त्वावर जोर दिला, इतरांनी झोमॅटोने पिकअपला उशीर करणाऱ्या ग्राहकांसाठी दंड प्रणाली लागू करण्याचा सल्ला दिला.

हेही वाचा – “कुठे पण जा, एकच प्रश्न…जेवलीस का?” मराठी तरुणाने हद्दच केली राव! थेट न्युयॉर्कमध्ये पोस्टर घेऊन फिरतोय, पाहा Viral Video

“ग्राहकाला ऑर्डर घेण्यासाठी पाच मिनिटे वेळ द्या. जर ते पाच मिनिटांत ऑर्डर गोळा करण्यासाठी आले नाहीत, तर त्यांच्याकडून रक्कम आकारणे सुरू करा, जेणेकरून डिलिव्हरी एंजटला त्रास होणार नाही. डिलिव्हरी पार्टनरने जे काही केले ते चुकीचे आहे परंतु त्याचे कारण माहित आहे, ”एका वापरकर्त्याने सांगितले.

हेही वाचा –“हे पुणे आहे भावा! इथे ॲलन वॉकर पण मराठीच वाजवतो”, तांबडी चामडी, गाण्यावर थिरकले पुणेकर, Video होतोय Viral

दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “वेळेचा आदर करणे हा देखील आदराचा एक प्रमुख प्रकार आहे. मग तो डिलिव्हरी व्यक्ती असो किंवा कंपनीचा सीईओ असो.

हेही वाचा –पुणेकरांचा लाडका बाप्पा! श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांची भली मोठी रांग, Viral Video पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Zomato या घटनेची चौकशी करत असताना, परिस्थितीने ग्राहक सेवा आणि उच्च-दबाव वातावरणात डिलिव्हरी एजंटच्या कामाच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला.

Story img Loader