झाडांवर आपण खरंच प्रेम करतो का? आपलं हे प्रेम फक्त बाल्कनीतल्या किंवा अंगणातल्या कुड्यांत असलेल्या झाडांपुरताच मर्यादित असतं का? कधी तरी रस्त्याच्या कडेला उभ्या असणा-या आणि उन्हात सावली देणा-या वृक्षावरही प्रेम करून पाहा एक वेगळाच आनंद मनाला मिळतो, हो पण फक्त प्रेमच करू नका जेव्हा या झाडांची कोणी कत्तल करायला आले की त्याच्याविरुद्ध आवाजही उठवता आपल्याला आले पाहिजे. जेरी नावाच्या वृद्ध महिलेने या सा-या गोष्टी पूर्णपणे आत्मसात केल्या आहेत म्हणूनच आज तिच्या लढ्याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वयाची सत्तरी ओलांडलेल्या जेरीच्या घराशेजारी एक झाड आहे, आपल्या डोळ्यांसमोर या झाडांची अनेक रुपे तिने पाहिली, वसंत ऋतूमधला झाडाला येणारा बहर, त्यावर चिमण्या पाखरांचा किलबिलाट, पुढे पानगळ. निसर्गचक्राबरोबर बदलणा-या जेरीचे दिवस हळूहळू पुढे सरकू लागले पण एक दिवस मात्र याच झाडाची कत्तल करण्यासाठी काही लोक आले. ती जागा एका कंपनीने विकत घेतली होती आणि त्यांना या झाडाची अडचण होत होती म्हणूनच ते कापण्यासाठी त्यांनी काही लोक पाठवले, जेव्हा जेरीला ही बातमी समजली तेव्हा ती झाडावर चढून उभी होती. जर झाड तोडायचे असेल तर आधी मला मारा असा पवित्रा तिने घेतला, त्यामुळे सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे गेले. पण दुर्दैवाने मात्र झाडं तोडण्याची परवानगी त्यांच्यांकडे होती त्यामुळे ही लढाई कोर्टात पोहोचली. कंपनीकडे परवानगी असल्याने मात्र जेरीला यावर काहीच करता आले नाही आणि तिच्या डोळ्यादेखत एका झाडाची कत्तल झाली.