Viral video: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. यात पाळीव प्राण्यांच्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. पाळीव प्राणी कुत्रा, मांजरींना घरातील सदस्य असल्यासारखी वागणूक कुटुंबीय देतात. त्यांना हवं नको त्याची काळजी घेतात. त्यामुळे पाळीव प्राण्यांचं आणि कुटुंबाचं जिव्हाळ्याचं नातं तयार झालेलं असतं. प्राण्यांना बरं नसलं की घरातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसून येते. मात्र इतकं प्रेम असलेला प्राणी जर कुणी चोरून नेला तर, विचार करा घरच्या सदस्यांना किती दु:ख होत असेल. असाच काही प्रसंग एका कुटुंबावर आला होता. लाडका कुत्रा कुणीतरी चोरून नेला. मात्र यानंतर कुत्र्याची मालकीण गप्प बसली नाहीतर तिनं त्या चोरांचा पाठलाग केला. तीनं अक्षरश: चोरांच्या गाडीच्या बोनेवटवरुन चोरांचा पाठलाग केला. या घटनेचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

झालं असं की या महिलेचा फ्रेंच बुलडॉग चोरट्यांनी चोरून नेला. या फ्रेंच बुलडॉग्सची पिल्ले जी सध्या सर्वात लोकप्रिय जातींपैकी एक आहेत. त्यांची किंमत अंदाजे ८३ हजाराच्या पुढे आहे. आपला कुत्रा चोरण्याचा प्रयत्न केला आहे हे कळताच महिलेनं चोरांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी तीनं स्वत:च्या जीवाचीही पर्वा न करत ती धावत्या कारच्या बोनेटवर लटकून राहिली. महिला धोकादायक पद्धतीनं लटकलेली व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र तरीही चोर कार स्पीड कमी न करता वाढवतच आहेत. हा थरार पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
criem news
विशाल गवळीने घरातच मुलीवर अत्याचार करून केली तिची हत्या , पत्नीच्या साह्याने मृतदेहाची विल्हेवाट

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मिठाईच्या दुकानात काम करताना कोसळला; २५ वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक, हृदयद्रावक मृत्यू कॅमेऱ्यात कैद

व्हिडिओला २० हजारापेक्षा जास्त लाईक्स आणि १ हजार कमेंट्स केल्या आहेत. यावर नेटकरी प्रतिक्रियाही देत आहेत, “मी तिची निराशा अनुभवू शकतो, कोणीतरी माझा कुत्रा चोरेल याची मी कल्पनाही करू शकत नाही.” “लोक इतके क्रूर का असतात?” दुसरा म्हणाला. “मी हे लाइव्ह पाहिलं, ते भयंकर होतं” तिसऱ्या युजरने कमेंट केली आहे..

Story img Loader