Viral video: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. यात पाळीव प्राण्यांच्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. पाळीव प्राणी कुत्रा, मांजरींना घरातील सदस्य असल्यासारखी वागणूक कुटुंबीय देतात. त्यांना हवं नको त्याची काळजी घेतात. त्यामुळे पाळीव प्राण्यांचं आणि कुटुंबाचं जिव्हाळ्याचं नातं तयार झालेलं असतं. प्राण्यांना बरं नसलं की घरातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसून येते. मात्र इतकं प्रेम असलेला प्राणी जर कुणी चोरून नेला तर, विचार करा घरच्या सदस्यांना किती दु:ख होत असेल. असाच काही प्रसंग एका कुटुंबावर आला होता. लाडका कुत्रा कुणीतरी चोरून नेला. मात्र यानंतर कुत्र्याची मालकीण गप्प बसली नाहीतर तिनं त्या चोरांचा पाठलाग केला. तीनं अक्षरश: चोरांच्या गाडीच्या बोनेवटवरुन चोरांचा पाठलाग केला. या घटनेचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा