काही महिलांना गाडी धड चालवता येत नाही असे खोचकपणे पुरुष मंडळी म्हणतात. सोशल मीडियावर तर याचे व्हिडिओ आणि मीम सुद्धा व्हायरल होत असतात. महिला आणि त्याचे गाडी चालवण्याची पद्धत ही नेहमी पुरूषवर्गाची टीकेचाच विषय ठरलाय. आता याला आणखी खतपाणी घातलंय ते सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोने. एका चीनी तरुणीने दुकानातून गाडी विकत घेतली. आपल्या नव्या को-या गाडीत बसून ही महिला घरी जात होती पण अचानक तिचा ताबा सुटला आणि नव्या गाडीचा काही मिनिटांत चुराडा झाला. बिचारी महिला.. नंतर गाडीतून उतरून त्या गाडीकडे पाहत बसली होती.

viral video : जंगलात सिंह पाहायला आलेल्या पर्यटकांना असे दिले राजाने दर्शन

चीनमधल्या महिलेने नवी कोरी गाडी विकत घेतली. ही गाडी ती घरी घेऊन जात होती, मात्र तिचा गाडीवरील ताबा सुटला आणि तिने पुलाला धडक दिली. अगदी काही मिनीटांपूर्वी विकत घेतलेल्या या गाडीचा क्षणार्धात चुराडा झाला. सुदैवाने या महिलेला मात्र काहीच झाले नाही. या नव्या को-या गाडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे महिलांना गाडी चालवता येत नाही अशी मानसिकता असणा-यांना हा विषय आयताच मिळाला. पण असे असले तरी एका सर्वेक्षणानुसार महिलाच या जबाबदारीने गाड्या चालवतात आणि महिला चालक असतील तर अपघातही टळतात असेही समोर आले आहे.

 

Story img Loader