सोशल मीडियाला प्रत्येक तासाला शेकडो व्हिडीओ व्हायरल होत असतील. पण लग्नसोहळ्यातील एका व्हिडीओनं इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. हरियाणाची प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार सपना चौधरी तिच्या डान्स आणि व्हिडीओमुळं नेहमीच चर्चेत असते. मात्र, तिच्या डान्सलाही टक्कर देईल अशाप्रकारचा भन्नाट डान्स एका महिलेनं केला आहे. लग्न मंडपात सपनाच्या गाण्यांवर डीजेच्या तालावर नाचायला अनेकांना आवडतं. पण साडी नेसून एका महिलेनं केलेला भन्नाट डान्स पाहून नेटकरी वाहवा वाहवा करत आहेत. ‘तेरी आंख्या का ओ काजल” या गाण्यावर महिला थिरकली अन् लग्नात उपस्थित असलेल्या पाहुण्यांच्या नजरा खिळल्या.

महिलेनं या गाण्यावर जबरदस्त ठुमके लगावत लोकांचं मनोरंजन केलं. तिचा हा भन्नाट डान्स कॅमेरात कैद झाला असून इंटरनेटवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.सपना चौधरीच्या तेरी आंख्या का ओ काजल गाण्यावर या महिलेनं जबरदस्त एनर्जीत डान्स केला आहे. महिला डान्स करण्यात दंग झालेली या व्हिडीओत दिसत आहे. उपस्थित असलेल्या लोकांचा विचार न करता ती तिच्या स्टाईलने गाण्यावर ठुमके लगावताना व्हिडीओत दिसत आहे. Shraddha temre katre नावाच्या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Brides entry in her wedding day
VIDEO: “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” लग्नात नवरीची जबरदस्त एन्ट्री; धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
Aishwarya And Avinash Narkar dance video
नारकर जोडप्याचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! Video पाहून मराठी अभिनेत्री म्हणते, “हा ग्रुप कसा जॉईन करायचा…”
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Sakhi Gokhale and suvrat joshi dance on shahrukh khan lutt putt gaya song
Video: सखी गोखले-सुव्रत जोशीचा पहाटे २ वाजता शाहरुख खानच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
Lakhat Ek Aamcha Dada
Video : महेश जाधवचा अभिनेत्रीबरोबर जबरदस्त डान्स; जुई तनपुरे व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आमचा मावळा…”

नक्की वाचा – “आली लग्न घटी समीप….” थांबा! नवऱ्याने हळदीच्या दिवशी भर मंडपात मैत्रिणींसोबत काय केलं? Video पाहून नेटकरी चक्रावले

इथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ प्रचंड गाजला असून आतापर्यंत जवळपास १ लाखांहून अधिक जणांनी लाईक केलं आहे. तसंच नेटकऱ्यांनी या व्हिडीओला भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. या महिलेच्या डान्सपुढे सपना चौधरीही फेल आहे, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. संगीत म्हणजे स्वत:ला विसरण्याचा मार्ग आहे, असंही एका नेटकऱ्यानं प्रतिक्रिया देऊन म्हटलं आहे. भोजपुरी गाणं ‘पतली कमरीया मोरो हाय हाय’ या गाण्यावरही अनेक जण भन्नाट डान्स करत असून सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Story img Loader