Viral Video: एखाद्या टाकाऊ वस्तूपासून उपयुक्त अशी वस्तू तयार करण्याची कला सर्वांनाच अवगत असते असे नाही. आपल्या घरात कितीतरी वस्तू असतात ; ज्या आपण काही दिवस वापरून फेकून देतो. कधी कधी तर चांगल्या असलेल्या वस्तूचीही आपण विनाकारण विल्हेवाट लावून टाकतो. मात्र वस्तूचा दुहेरी उपयोग करू शकतो हे बहुदा आपण विसरूनच जातो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मायक्रोवेव्ह ओव्हन खराब झाल्यावर टाकून न देता त्याचा पुन्हा खास पद्धतीत वापर करण्यात आला आहे.
आपल्या पर्यावरणाचे रक्षण करणे अधिकाधिक महत्त्वाचे होत चालले आहे. तसेच त्यासाठी पुनर्वापर करणे हा एक प्रमुख मार्ग आहे. जुनी उपकरणे फेकून देण्याऐवजी आपण त्यांचा पुनर्वापर करू शकतो.फक्त प्लास्टिकच्या बाटल्या किंवा जुन्या कपड्यांचा नाही. तर तुम्ही स्टील आणि ॲल्युमिनियम सारख्या वस्तूंचा सुद्धा पुनर्वापर करू शकता. तर आज असंच एका महिलेने सुद्धा केलं आहे. तिने जुन्या मायक्रोवेव्ह ओव्हनचे इको-फ्रेंडली टपालपेटी (मेलबॉक्स) मध्ये रूपांतर केलं आहे. महिलेनं कशाप्रकारे जुन्या मायक्रोवेव्ह ओव्हनचे इको-फ्रेंडली टपालपेटी (मेलबॉक्स) मध्ये रूपांतर केले व्हायरल व्हिडीओतून पहा.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, न्यूयॉर्कच्या रहिवासी महिलेनं तिच्या घराबाहेर छोट्याश्या बागेत एका स्टँडवर हे जुने मायक्रोवेव्ह ओव्हन ठेवून दिले आहे. तसेच पोस्टमनला कळावे म्हणून तिने या मायक्रोवेव्ह ओव्हनवर ‘टपालपत्र’ ( मेलबॉक्स) असा मजकूर लिहिला आहे. तसेच पोस्टातून एखादे पार्सल किंवा पत्र आले तर ते आत ठेवण्यासाठी ‘उघडण्यासाठी हे बटण दाबा’ असा मजकूर सुद्धा लिहिला आहे. जेणेकरून पोस्टमनला सुद्धा मायक्रोवेव्ह ओव्हन हे ‘टपालपत्र’ आहे असे सहज कळेल.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @upworthy या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. महिन्याला येणारं वीजबिल तुमच्या दारापर्यंत पोहचवले जाते. तसेच बँकेतून येणारी महत्वाची कागदपत्रे सुद्धा तुम्हाला पोस्टाद्वारे येतात तर अनेकदा पत्र ठेवण्यासाठी दाराबाहेर कोणताही बॉक्स किंवा दुसरे कोणतीही वस्तू उपलब्ध नसल्यामुळे ते पत्र किंवा बँकेची महत्वाची कागदपत्रे अशीच दरवाजाबाहेर पडून असतात. तर यावर उपाय म्हणून महिलेने अजब शक्कल लढवली आहे आणि जुन्या मायक्रोवेव्ह ओव्हन इको-फ्रेंडली टपालपेटी (मेलबॉक्स) मध्ये रूपांतर केले आहे.