Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
या वर्दळीच्या भर रस्त्यात महिलेने कॅबचा दरवाजा उघडल्याने रिक्षा आणि कारमध्ये धडक बसल्याचा प्रकार समोर आला आहे. एका कारच्या डॅशबोर्ड वरील व्हिडिओ मध्ये सारा प्रकार कैद झाला आहे. अशा परिस्थितीमध्येही ती महिला स्वत:ची चूक मान्य न करता अत्यंत शांतपणे निघून गेली. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर एका बाजूला ट्राफिक आहे तर दुसऱ्या बाजूला वाहनांची वर्दळ सुरु आहे. यावेळी ट्रॅफिकमध्ये असलेला कॅब ड्रायव्हर गाडी थांबवतो आणि आतमध्ये असलेली महिा बाहेर मागे-पुढे न पाहताच कॅबचं दार उघडते. अशावेळी मागून येणारी रिक्षा कॅबचं दार उघडल्यामुळे जोरदार धडकते. यामध्ये तुम्ही पाहू शकता, ही महिला काहीच झालं नाहीये, याप्रमाणे तिथून निघून जाते.
मात्र यामध्ये कॅबचं आणि रिक्षाचं दोन्हीचं नुकसान होतं. दोघेही बाजुला गाडी थांबवतात मात्र तोपर्यंत ती महिला निघून जाते.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> स्मार्ट चोर! सर्वांच्या डोळ्यादेखत असा उडवला iPhone; चोरीची पद्धत पाहून अवाक व्हाल, VIDEO VIRAL
सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. @3rdEyeDude नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
आजच्या जगात कुणाला मागं राहायचं नाही, सगळ्यांना पुढं जायचं असतं. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही संताप व्यक्त करत आहेत. तर गाडी चालवताना आपल्या बरोबरच दुसऱ्याच्याही जीवाचा विचार करावा असा सल्ला देत आहेत.