Woman Dancing on marathi song: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओमध्ये डान्सच्या व्हिडिओची संख्या जास्त असते. लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्या वयोगटातले लोक आजकाल डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. काही लोक तर सार्वजनिक ठिकाणीही बिनधास्त डान्स करुन त्याचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात.सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात बऱ्याचदा डान्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात समोर येत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेक असे डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस येत असतात तर कधी अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने नेटकऱ्यांच्या कायम आठवणीत राहत असतात. काही लोक इतक्या विचित्र पद्धतीने डान्स करतात की पाहूनच अजब वाटतं. तर काही अशाप्रकारे डान्स करतात की पाहतच राहावंस वाटतं. जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सध्या सोशल मीडियावर काही महिलांच्या एका ग्रुपचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओची सध्या सर्वत्र मोठी चर्चा होत आहे. सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात. दरम्यान अशाच काही हौशी महिलांचा गृप डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साडी नेसून या महिलांनी चाळीतल्या छोट्याशा जागेत भन्नाट डान्स केला आहे जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

“सोडा सोडा राया हा नाद खुळा” या मराठमोळ्या गाण्यावर या महिलांना जबरदस्त हाव-भाव आणि स्टेप्स मारत डान्स केला आहे. या महिलांचा डान्स पाहून प्रत्येकजण त्यांच कौतुक करत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पाच महिला सुंदर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. त्या अप्रतिम असा डान्स करताना दिसत आहे. त्यांचा उत्साह पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल. एवढचं नाहीतर या महिलांनी स्टेप अशा केल्या आहेत की, जणू काही त्या प्रोफेशनल डान्सरच आहेत. चाळीतल्या मोकळ्या जागेत त्यांनी हा व्हिडिओ शूट केल्याचे दिसत आहे.संसार, कुटुंब, कामाचं टेंशन विसरून महिला स्वत:ची आवड जपताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ mansi.gawande.73 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman dance on marathi song lavni soda soda raya ha naad khula video goes viral srk