Video Shows Women Dance On Mast Challay Amcha Song : सध्या सोशल मीडियावर आपण काय वेगळं करू शकतो हे दाखवण्याची जणू काही स्पर्धाच सुरू असते. त्यामध्ये अगदी स्वयंपाक, शिवणकाम, डान्स करण्यापर्यंतचे अनेक व्हिडीओ असतात, जे अनेकांच्या चेहऱ्यावर नकळत आनंद देऊन जातात. तर असाच एक चाळीतल्या महिलांचा ग्रुप आहे. त्यांचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या चाळीतल्या महिला नवनवीन ट्रेंडिंग गाण्यावर हमखास व्हिडीओ बनवतात आणि स्वतःची हौस पूर्ण करतात.
आज या चाळीतल्या महिला वैशाली सामंतने गायलेल्या ‘मस्त चाललंय आमचं’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. डान्सचा अगदी व्यवस्थित सराव करून ग्रुपमधील सगळ्या महिला छान नटून, साडी नेसून तयार झाल्या आहेत. त्यानंतर गाणे वाजते आणि सगळ्या महिला अगदी परफेक्ट स्टेप्स करत डान्स करण्यास सुरुवात करतात. त्यांचे हावभाव, त्यांच्या स्टेप्स, त्यांचा ताळमेळ आणि त्यांचा उत्साह अगदी बघण्यासारखा आहे, जो पाहून तुम्हालाही हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघावासा वाटेल.
आयुष्याचा पुरेपूर आनंद कसा घ्यावा,हे तुमच्याकडून शिकावे (Viral Video) :
अनेकदा घरकामामुळे महिलांना स्वतःच्या आवडी-निवडी पूर्ण करण्यासाठी वेळ मिळत नाही. पण, सोशल मीडियावर इतर महिलांना पाहून अनेकांना प्रेरणा मिळते. त्यामुळे या चाळीतल्या पाच महिलासुद्धा अगदी वेळात वेळ काढून छान तयार होतात. एखादे मराठी गाणे निवडून, त्यावर डान्सच्या अगदी सोप्या स्टेप्स बसवत आणि त्यांची डान्स करण्याची आवड पूर्ण करतात. फक्त डान्सच नाही, तर गाण्यातील प्रत्येक ओळसुद्धा त्या अगदी हावभावासह म्हणतात; जे खूपच कौतुकास्पद आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @mansi.gawande.73 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी पुन्हा एकदा या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडताना दिसत आहेत. “तुमच्या पूर्ण ग्रुपचा डान्स एकदम सिंपल, सुंदर असतो आणि कोरिओग्राफीसुद्धा मस्त असते”, “मनमोहक नृत्य सादरीकरण”, “खूप छान वाटतंय… जेव्हा जेव्हा मी दुःखी किंवा निराश असतो तेव्हा मी ते व्हिडीओ पाहतो… आयुष्याचा पुरेपूर आनंद कसा घ्यावा, हे तुमच्याकडून शिकावं” आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.