सध्याच्या घडीला सोशल मीडियावर जर कोणता ट्रेंड लोकांच्या डोक्यात फिरत असेल तर तो बंगाली गाणं ‘कच्चा बदाम’. गेल्या पाच महिन्यांपासून सोशल मीडियावर अधिराज्य गाजवणाऱ्या या गाण्याने सर्वसामान्यांनाच नव्हे, तर बड्या सेलिब्रिटींनाही नाचायला भाग पाडले आहे. आता या गाण्यावरचा आणखी एक रील समोर आला आहे, ज्यामध्ये एक महिला रस्त्याच्या कडेला जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे ‘सोशल मीडियाच्या जगात’ धुमाकूळ निर्माण झाली आहे.
योग प्रशिक्षक भारती हेगडे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ बघता बघता इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे एके काळी भुबन बड्याकरने गायले होते, रस्त्यावर फिरणाऱ्या शेंगदाणे विक्रेत्याने, जो आता एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. आता एका योग प्रशिक्षकाने या गाण्यावर जोरदार डान्स परफॉर्मन्स दिला आहे, ज्याचा व्हिडीओ इंटरनेटच्या जगतात धुमाकूळ घालत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये योग प्रशिक्षक भारती यांनी सर्वप्रथम तिची कार रस्त्याच्या कडेला उभी केल्याचं तुम्ही पाहू शकता. कार बाजुला उभी करून तिने हा ट्रेंड फॉलो करत अप्रतिम डान्स केलाय. या गाण्याची लोकप्रिय हुक स्टेप त्याने किती छान पद्धतीने फॉलो केली आहे ते तुम्ही पाहू शकता. चला तर मग हा व्हिडीओ पाहूया.
आणखी वाचा : रुग्णाला डॉक्टरांनी आधी इंजेक्शन दिलं मग मारहाण केली, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : साउथ सुपरस्टार विजयच्या ‘हलमिथी हबीबो’ गाण्यावर BTS बॅण्ड बॉईजचा डान्स, एकदा पाहाच
भारतीने २९ जानेवारीला हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला होता. आतापर्यंत या व्हिडीओला २ लाख ६६ हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केलं आहे. त्याने या व्हिडीओवरील आपला कमेंट सेक्सन बंद केला आहे, त्यामुळे लोकांच्या प्रतिक्रिया कळत नाहीत. पण एक गोष्ट मात्र नक्की की या व्हिडीओला किती लोकं लाइक करत आहेत यावरून व्हिडीओ लोकांना किती आवडलाय याचा अंदाज लावता येतो.
पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या भुबन बड्याकरने खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी ‘कच्चा बदाम’ हे गाणं तयार केलं होतं. पण त्याच्या या गाण्यावर आज सगळ्यांना नाचायला भाग पडेल याची कल्पना नव्हती. भुबन बड्याकरचे गाणे नंतर रिमिक्स केले गेले आणि YouTube वर अपलोड केले गेले. यावर या गाण्याला आतापर्यंत १०९ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाली आहेत.