Woman Dancing On Chammak Challo Track: भारतात बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी काश्मीर किंवा इतर डोंगराळ ठिकाणी जावे लागते, परंतु कॅनेडात थंड तापमानात खूप बर्फवृष्टी होते आणि तेथील हवामान अनुभवणे खूप छान असते. आपण अनेकदा पाहिलं असेल की, जेव्हा जेव्हा बर्फ पडतो तेव्हा लोकांना थंडीतही बाहेर पडायला आवडते. सध्या कॅनडाच्या या बर्फवृष्टीतील असाच एका महिलेचा भन्नाट डान्स व्हायरल होत आहे. या महिलेने लाल रंगाचा लेहेंगा घालून छम्मक छल्लो गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय जो प्रचंड व्हायरल होत आहे.
बॉलीवूडच्या छम्मक छल्लो गाण्यावर महिलेचा भन्नाट डान्स
हा व्हायरल व्हिडिओ नीतू जीवनानीने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ती बॉलिवूडच्या छम्मक छल्लो गाण्यावर डान्स करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डान्स व्हिडिओमध्ये दिसणारी महिला स्वतः नीतू जीवनानी आहे. बर्फवृष्टीमध्ये ही महिला बॉलीवूडमधील छम्मक छल्लो या गाण्यावर नाचताना दिसत आहे. सगळीकडे बर्फाळ भाग असताना देखील या महिलेने लेहेंगा घालून केलेला डान्स प्रचंड व्हायरल होत आहे.
( हे ही वाचा: बायको मागच्या सीटवर बसलेली असताना या पठ्ठ्याने बुलेटवर काय केलं पाहिलं का? Video होतोय Viral)
येथे पाहा महिलेचा भन्नाट डान्स
( हे ही वाचा: लग्नात बेभान नाचत होती ‘ही’ पाकिस्तानी महिला; लता मंगेशकर यांच्या गाण्यावरील ‘ती’ अदा पाहून नेटकरीही फिदा)
व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होतोय
या व्हिडिओमध्ये नीतू जीवनानी नावाच्या महिलेने केलेला डान्स आपल्याला या गाण्याच्या ओरिजनल स्टेप्सची आठवण करून देतो. कॅनडातील पहिल्या बर्फवृष्टीत या महिलेने बर्फाच्छादित घरांबाहेर या सुपरहिट गाण्यावर नृत्य करून आपले कौशल्य दाखवून दिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक त्या महिलेचे कौतुक करत आहेत.