प्रत्येकाला आपण सुंदर, छान दिसावे असे वाटत असते. विशेषत: मुलींना आपण इतरांपेक्षा वेगळे दिसावे असे वाटत असते. यात काही मुलींना आपला नॅचरल कलर आणि बॉडी शेप आवडत नाही. यासाठी मुली अनेक वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसतात. यात अनेक ब्यूटी प्रॉडक्ट, थेरपी, सर्जरी करतात. यात हल्ली अनेक जण कॉस्मेटिक सर्जरीचा वापर मोठ्या प्रमाणात करत असल्याचे दिसतेय. पण ही कॉस्मेटिक सर्जरी एका महिलेच्या अंगलट आल्याचे प्रकरण समोर आले आहे. एका महिलेने डोळ्यांवर सर्जरी केली आणि नंतर तिची अशी भयानक अवस्था झाली आहे. सोशल मीडियावर या महिलेने तिच्याबाबत घडलेली अशीच एक घटना शेअर केली आहे.
३७ वर्षीय नसरीन कैलफिल्डला खूप दिवसांपासून मांजरीसारखे डोळे हवे होते. गेल्या अनेक दिवसांपासून तिची मांजरीसारखे डोळे दिसावेत अशी इच्छा होती. यासाठी तिने कॉस्मेटिक सर्जरी करण्याचा विचार केला. यानंतर तिने डोळ्यांची शस्त्रक्रिया करून घेतली, पण शस्त्रक्रियेनंतर तिचा चेहरा पूर्णपणे विचित्र झाला.
नसरीनने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सर्जरीआधीचा आणि नंतरचा तिचा चेहरा ज्यांनी पाहिला त्या प्रत्येकाने आता खेद व्यक्त केला आहे. मात्र या सर्जरीनंतर आता तिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. नसरीनने शस्त्रक्रियेनंतरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याला आता लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
तुमच्याही हाताची त्वचा निघतेय का? मग जाणून घ्या त्यामागची कारणे आणि घरगुती उपाय
अनेकांना नसरीनचा आधीचा लूक खूप आवडला होता. अनेकांनी कमेंट करत म्हटले की, एवढे डोळे वर करण्याचा काय अर्थ आहे? अनेकदा कोणतीही कॉस्मेटिक सर्जरी केल्यावर सुरुवातील चेहरा खूप सुजतो. यामुळे चेहरा विचित्र दिसू लागतो. पण हळूहळू सुधारणा होते. असेच नसरीनच्या बाबतीत घडले असावे असा अंदाज आहे. आता तिच्या चेहऱ्यावरील सूज कमी झाली असून तो पूर्वीपेक्षा चांगला दिसू लागला आहे.