Viral Video : सध्या लग्न समारंभ सुरू आहे. सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. लग्नाची सजावट, नवरी नवरदेवाचा लूक, लग्नातील डान्स-गाण्याचे व्हिडीओ, लग्नातील विविध प्रथा, उखाण्याचे व्हिडीओ, मेहेंदीचे व्हिडीओ, दागिन्यांचे, साड्यांचे व्हिडीओ सध्या चांगलेच चर्चेत आहे. सध्या एका महिलेच्या हातावरची मेहेंदी चर्चेचा विषय ठरली आहे. या महिलेने तिच्या हातावर मेहेंदीच्या मदतीने तिचा लग्नापासून ते घटस्फोटापर्यंतचा संपूर्ण प्रवास सांगितला आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की कसा? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. (Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design video goes viral on social media)

महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एका महिलेचा हात दिसेल. या हातावर मेहेंदी काढली आहे. मेहेंदीच्या स्वरुपात लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत प्रवास सांगितला आहे. व्हिडीओत तुम्हाला सुरुवातीला दोन हात एकमेकांशी जुळलेले दिसेल. त्यावर लिहिलेले आहे, एक दिवस जो नेहमी लक्षात राहीन. त्यानंतर खाली लिहिलेय, “लग्नानंतर” त्याखाली एका महिलेचे चित्र रेखाटले आहे आणि तिच्या अंगावर पाय ठेवलेला दिसत आहे. त्याच्या शेजारी एक बादली आणि ब्रश ठेवला आहे. त्यात लिहिलेय, “सून बनली मोलकरीण” त्यानंतर खाली लिहिलेय, “परक्याचे घर आपले मानले, काय चूक होती माझी?” त्याखाली पती पत्नी भांडण करताने चित्र काढले आहे. पुढे एका बाजूला हॉर्ट ब्रेकचे चित्र काढले आहे आणि त्या समोर लिहिलेय, “सासरच्यांनी पण सहकार्य केले नाही.” पुढे एका तरुणीचे चित्र काढले आहे. त्याखाली लिहिलेय, “अखेर घटस्फोट झाला” बोटावर न्यायाचे प्रतिक म्हणून गॅवेल आणि तराजूचे चित्र काढले आहे.

bhopal crime news
Bhopal Crime: वृद्ध आजारी आईला घरात बंद करून मुलगा फिरायला गेला, महिलेचा तहान-भुकेनं दुर्दैवी मृत्यू!
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Penguin politely waits for couple
माणसांपेक्षा प्राण्यांना जास्त कळतं? वाटेतून जोडपं बाजूला झालं अन्… पाहा पेंग्विनचा ‘हा’ Viral Video
Man Tries to Help Girls Who Fell Off Scooty, But What Happens Next is Shocking
पापाच्या परींची मदत करायला गेला तरुण अन् होत्याचं नव्हतं झालं; VIDEO पाहून येईल अंगावर काटा
dhananjay munde valmik karad
Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!
solapur farmer murder
Solapur Crime News : सोन्याच्या हव्यासापायी सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून; मृतदेहाचे तुकडे करून शौचालयाच्या शोष खड्ड्यात पुरले
Image of a Jail.
Gay Couple : अमानुष कृत्य… समलैंगिक जोडप्याकडून दत्तक मुलांवर बलात्कार, न्यायालयाने सुनावला १०० वर्षांचा कारावास
Vinod Kambli Diagnosed with Clots in Brain| Vinod Kambli Health Update
Vinod Kambli Health Update: विनोद कांबळींच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी, मोफत उपचार करण्याचा रुग्णालयाचा निर्णय

हेही वाचा : VIDEO: “खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे मला” पाहुण्यांसमोर नवरीने केला असा डान्स की नवरदेव झाला लाजून लाल

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : पाकिस्तानातून पळून आलेली सीमा हैदर आता पाचव्यांदा होणार आई, सोशल मीडियावर VIDEO शेअर करत दिली गुड न्यूज, पण सचिन म्हणाला…

urvashis_mehandi_and_makeover या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “अखेर घटस्फोट झाला”
सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यापूर्वी मेहेंदीचे अनेक हटके व्हिडीओ तुम्ही पाहिले असेल पण असा व्हिडीओ पहिल्यांदाच पाहिला असावा.

Story img Loader