Woman Desi Jugaad For Rainwater Harvesting : जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे थेंब थेंब पाणीही खूप मोलाचं आहे. पाणी टंचाईमुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याने काही माणसं थेंबे थेंबे तळे साचवतात. अशातच पाण्याची बचत करण्यासाठी एका महिलेनं घराच्या खिडकीत भन्नाट जुगाड केला. आजही अनेक लोक पावसाचं पाणी साचवतात. कारण या पाण्याच्या वेगळ्या पद्धतीने वापर करता येईल. पावसाचं पाणी साचवण्याच्या अनेक पद्धती आहेत. पण नुकतच सोशल मीडियावर रेनवॉटर हार्वेस्टिंगचा एक जबरदस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका महिलेनं घराच्या खिडकीत भन्नाट जुगाड करून पावसाचं पाणी साचवलं आहे. या जुगाडामुळे पावसाचं पाणी थेट बाथरुममध्ये साचलं जातं. महिलेच्या देशी जुगाडाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

पावसाळ्यात पाणी साचवण्यासाठी अनेक लोक देशी जुगाड करतात. इंटरनेटवर अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाप्रकारचे व्हिडीओ पाहून लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसतो. या महिलेनंही थेंब थेंब पाणी वाचवण्यासाठी भन्नाट कल्पना केली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पाण्याचं महत्व किती असतं हे अनेकांना समजलच असेल. कारण काही ठिकाणी पाणी टंचाईच्या झळा अजूनही लोकांना बसत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे महिलेनं पाणी साचवण्यासाठी खिडकीत जुगाड केला. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, पॉलिथीनला खिडकीच्या बाहेर बांधलं आहे. याचसोबत त्या महिलेनं प्लास्टिक बॉटलला कापून योग्य ठिकाणी फिक्स केलं आहे. बाटलीच्या सुरुवातीला एक पाईपही लावला आहे. कारण पाईपाच्या माध्यमातून पावसाचं पाणी थेट घराच्या वॉशरुममध्ये ठेवलेल्या टबमध्ये साचलं जाईल.

Fake IPS in Bihar Video viral
Bihar Teen Fake IPS: अंगावर वर्दी अन् कमरेला पिस्तूल, दोन लाख देऊन बनला IPS अधिकारी, पण ड्युटी जॉईन करणार इतक्यात…
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
boyfriend tries to convince his upset girlfriend on the road
रुसलेल्या गर्लफ्रेंडला मनविण्यासाठी तरुणानं भर रस्त्यात काय केलं पाहा; सगळेच पाहू लागले अन् शेवटी…, VIDEO झाला व्हायरल
Mother and son did theft, Nagpur theft,
नागपूर : पोटासाठी काहीही! मायलेकाने चहाटपरी लावण्यासाठी…
Manu Bhaker Special Message to Neeraj Chopra on His Injury in Diamond League
Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेरचा नीरज चोप्रासाठी खास संदेश, दुखापतीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हणाली…
Use wet socks to reduce fever in children
लहान मुलांचा ताप कमी करण्यासाठी ओले सॉक्स वापरावे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला..
Fan came inside the stadium to meet Babar Azam
बाबर आझमला भेटायला आला चाहता, हारिस रौफने पाहिलं आणि…. VIDEO व्हायरल
st bus video viral
सीट पकडण्यासाठी आप्पा थेट खिडकीवर चढले, प्रवासी अन् कंडक्टर पाहतच राहिले, एसटी बसचा Video होतोय व्हायरल

नक्की वाचा – Optical Illusion: फोटोत ससा दिसतोय का? पण तो ससा नाही, एकदा क्लिक करून नीट पाहा

इथे पाहा महिलेच्या जुगाडाचा व्हिडीओ

व्हिडीओत दिसत आहे की, महिला टबमध्ये भरलेलं पावसाचं पाणी ड्रममध्ये ट्रांसफर करते. कारण या पाण्याचा पुन्हा वापर करता यावा. महिला त्याच पाण्याने कपडे धुवत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिलेचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ pranaligaikwad_1998 नावाच्या यूजरने शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २ लाख ४० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर ३३ लाखांहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलं, भारतीयांचा जुगाडाच्या बाबतीत नाद नाही.