Banana buying guide tips: केळं हे असं फळ आहे जे आरोग्यासाठी अनेक दृष्टीने लाभदायक ठरतं. केळीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक केळं खाल्ल्याने दिवसभर शरीरात चांगली उर्जा टिकून राहाते. केळी हे फळ जवळपास सगळ्यांनाच आवडते. या फळाचे वैशिष्ट्य म्हणजे हे प्रत्येक हंगामात बाजारात उपलब्ध असते. केळी हेल्दी असण्यासोबतच खायलाही खूप चविष्ट असतात. केळी बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून अशा वेळी केळी खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्या नाहीतर आरोग्यावर त्याचा दुषपरिणाम होण्याची शक्यता असते.
तुम्ही पाहिलं असेल केळी बरेच दिवस ठेवल्यावर केळीवर डाग येतात. मात्र आपल्यापैकी बऱ्याच जणांचा असा समज असतो की ते काळे डाग हे बाहेरुन असतात. एकदा साल काढली की आतमध्ये केळी चांगली असते. मात्र हा समज तुम्हाला आजरी पाडू शकतो.
सोशल मीडियावर एका महिलेनं यासंदर्भात माहिती दिली आहे. या महिलेनं एक व्हिडीओ पोस्ट केला असून व्हिडीओ बघून तुम्हालाही धक्का बसेल. या महिलेनं केळीवर एक विशिष्ठ प्रकारचा डाग दाखवला आहे. तसा डाग असेल ततर चुकुनही ती केळी खाऊ नका. कारण या महिलेनं सांगितलं हा फक्त एक डाग नसून ते कोळ्यांचं घर आहे. हा जो पांढरा डाग दिसत आहे तो डाग नसून कोळ्याच्या अंड्यांचं घर आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> झोपेत असताना मित्रासोबत केला प्रँक; पण शेवटी मस्करीची झाली कुस्करी…पाहा धक्कादायक VIDEO
त्यामुळे केळी खरेदी करताना नक्की तपासून घ्या. सोशल मीडियात व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @anvihan या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर देत आहेत.