मेट्रो ट्रेनच्या कोचमध्ये प्रवाशांचे मनोरंजन करणाऱ्या लोकांचे भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. ट्रेनमध्ये डीजेच्या तालावर ठुमके लावणाऱ्या लोकांचेही व्हिडीओ समोर आले आहेत. काही लोकांच्या अशा बेकायदेशीर कृत्यांमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. आताही अशाच प्रकारचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक महिला चक्क मेट्रो ट्रेनच्या रेलिंगला लटकून व्यायाम करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. कॅलिस्थेनिक्स प्रकारचा वर्क आऊट करणाऱ्या महिलेनं ट्रेनमध्ये स्टंटबाजी करून प्रवाशांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिलेचा हा व्हिडीओ jagjot_k143 नावाच्या यूजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. एक महिला ट्रेनच्या डब्ब्यात असलेल्या रेलिंगवर भन्नाट स्टंटबाजी करत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. ती महिला हॅंड रेलिंगचा वापर करून बॅक फ्लिप करत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. एका व्यक्तीने त्या महिलेचा व्हिडीओ रेकॉर्ड करून इंटरनेटवर व्हायरल केला आहे. महिलेची व्यायाम करण्याची पद्धत पाहून प्रवासी थक्क झाले.

नक्की वाचा – Video: रस्ता ओलांडणाऱ्या हत्तींच्या कळपाशी पंगा, IFS अधिकारी संतापले, यूजर्स म्हणाले, “तरुणांना लगेच अटक करा…”

इथे पाहा व्हिडीओ

या व्हिडीओला आतापर्यंत ११ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले यूजर्सने वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलं, ‘सार्वजनिक ठिकाणे आणि सरकारी मालमत्तेचा वापर स्टंटबाजी करण्यासाठी नाहीय.’ दुसऱ्या यूजरने म्हटलं, ‘रेलिंग तुटल्यावर काय होणार?’. त्या महिलेचे स्टंट्स पाहून काही लोक चकीत झाले आहेत. अन्य एका यूजरने म्हटलं, ‘खूप छान जगजोत.’ तसंच आणखी एका यूजरने म्हटलं, ‘या महिलेचा आदर करा.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman doing calisthenics workout by hanging on a railing of metro trail people stunned after watching this shocking video on instagram nss