तापमान शून्याखाली असताना आणि सगळीकडे बर्फ असताना एका महिलेने एका भारतीय जवानासोबत पुशअप चॅलेंज करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये अतिशय हिमतीने आणि जोशात पुशअप करणाऱ्या या महिलेचे नाव नेहा बांगीया [Neha Bangia] असे आहे आणि ती एक फिटनेस प्रशिक्षक आहे, असे तिच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवरून समजते. व्हायरल होणारा हा व्हिडीओदेखील तिने आपल्या @thatfitmum या इन्स्टाग्रामच्या हॅण्डलवरून शेअर केला गेला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“खरे तर मी माझा पुशअप करतानाचा व्हिडीओ बनवत असताना, मागे उभ्या असलेल्या एका जवानाने मला येऊन सांगितले, ‘इथे आम्ही दररोज व्यायाम करतो. कारण- थंडी सहन करण्यासाठी तोच सर्वोत्तम पर्याय आहे. पण आम्ही कधीच या अशा ठिकाणी कोणत्या स्त्रीला पुशअप करताना पहिले नव्हते.’ त्यानंतर दुसरा जवान माझ्यासोबत पुशअप करण्यासाठी पुढे आला. मी जवळपास १५ पुशअप आधीच मारले होते आणि बर्फामुळे हातही थोडे सुन्न पडले होते. पण आपल्या सैनिकांसोबत व्यायाम करण्याच्या संधीला कुणी नाही कसं म्हणू शकेल? त्यामुळे हे मी माझे भाग्य समजते आणि आपल्या जवानांना सलाम करते,” असे काहीसे भावनात्मक तिने तिच्या व्हिडीओखाली लिहिल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

हेही वाचा : कासवाने केला १९१ वा वाढदिवस साजरा! गिनीज बुकनेदेखील घेतली दखल; व्हिडीओ पाहा

इतकेच नव्हे, तर तिने कॅप्शनमधून आपल्या भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. अशा खडतर हवामानामध्ये इतके उत्साही राहून, तेथील सर्व परिस्थिती सहन करून कोणत्याही प्रकारची तक्रार न करता, सदैव आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी ते तत्पर असतात. याबद्दल तिने त्यांचे आभारदेखील मानले आहेत.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओला तब्ब्ल ११.१ मिलियन इतके व्ह्युज मिळाले असून, तीन लाख ७९ हजार लाइक्सदेखील मिळाले आहेत. त्यासोबतच यावर नेटकऱ्यांनी भरपूर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्यातील काही प्रतिक्रिया पाहा-

या व्हिडीओवर एकाने, “आपल्या भारतीय जवानांना सलाम! काय वेग आहे, खूपच मस्त”, अशी प्रतिक्रिया दिली. दुसऱ्याने, “एवढ्या थंडीतही तुम्ही जवानासोबत तेवढ्याच जिद्दीने पुशअप करीत आहेत याबद्दल फारच कौतुक वाटते,” अशा स्वरूपाची प्रतिक्रिया दिली आहे. तिसऱ्याने “काही जण म्हणत आहेत की, त्या सैनिकाचा वेग फारच जास्त आहे; पण मिलिटरी पुशअप असेच केले जातात,” असे काहींना खडसावलेले आपल्याला पाहायला मिळेल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman doing push up challenge in ice with indian army soldier watch this viral video dha