Viral video: सोशल मीडियाच्या जगात कधी काय पाहायला मिळेल ते सांगता येत नाही. अनेकवेळा आश्चर्यचकित करणारे व्हिडिओ समोर येतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर विश्वास बसणे कठीण आहे की असे खरेच घडू शकते का? काही वेळा धक्कादायक व्हिडीओ ही पाहायला मिळतात. अलीकडे सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये महिला पाण्यात जलपरी बनून पोहताना दिसत आहे मात्र तितक्यात तिथे एक मासा येतो आणि महिलेला खाण्याचा प्रयत्न करतो, तो मासा अक्षरश: तरुणीचा चेहरा आपल्या तोंडात टाकत तिला खाण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वॉटर एक्वैरियममध्ये जलपरी पोशाख परिधान केलेल्या महिलेवर मोठ्या माशाने हल्ला केल्याची हृदयद्रावक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महिलेवर अचानक एका मोठ्या माशाने हल्ला केल्याचे दिसून येत आहे. महिलेची कामगिरी पाहण्यासाठी आलेल्या लोकांनाही या हल्ल्याने धक्का बसला. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता यात महिला निळ्याशार पाण्याच्या आत जलपरीचा पोशाख घालून काही कर्तब करू पाहत असते मात्र तितक्यात तिच्या मागून एक मोठा मासा येतो आणि महिलेला काही समजेल त्याच्या आधीच तिच्यावर हल्ला करत तिचे डोके आपल्या तोंडात पकडतो. असे घडताच पुढच्याच क्षणी महिला सतर्क होते आणि माशाच्या तोंडातून आपल्या डोके बाहेर काढत तिथून पळ काढते. या घटनेने मात्र आता सर्वचजण हादरले असून याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

झालं असं की २२ वर्षीय जलपरी अॅनिमेटर चीनच्या जिशुआंगबन्नामध्ये अॅक्वेरिअमच्या आत परफॉर्म करत होती. तिथे अनेक प्रेक्षकही उपस्थित होते. तरूणी परफॉर्म करत असताना अचानक एक मोठा मासा तिथे आला आणि तिच्या हल्ला केला. तरूणी घाबरली, पण तिने हिंमत दाखवत आपलं डोकं मास्याच्या तोंडातून सोडवलं. साधारण ६ सेकंदाची ही क्लीप इथेच संपते. हा व्हिडीओ पाहून लोकांना धक्का बसला. यूजर्सनी व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, जिशुआंगबन्ना प्रिमिटिव फॉरेस्ट पार्कवर ही घटना लपवण्याचा आरोप करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ meerkat.mediaa नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman dressed as mermaid dancing inside water tried to eaten by giant fish shocking video goes viral on social media srk