देशभरातील काही मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोडचे नियम तयार करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी तुळजापुर येथील श्री तुळजाभवानी मंदिर आणि मंदिराचा परिसर या ठिकाणी वेस्टर्न कपडे अर्थात पाश्चात्य कपडे घालून येणाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. या नंतर लगेचच पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक महागणपती रांजणगाव मंदिर प्रशासनाने देखील असाच निर्णय घेतला होता. मात्र आता समोर आलेला प्रकार खूपच भयानक आहे. सध्या सोशल मीडियावर बाली येथील एका मंदिरातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला चक्क नग्न अवस्थेत मंदिरात प्रवेश करतेय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिलेने नग्न अवस्थेत केला मंदिरात प्रवेश

हा व्हिडीओ इंडोनेशियातील बाली येथील एका मंदिरातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक जर्मन महिला नग्न अवस्थेत मंदिरात प्रवेश करते. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी महिलेने आपले सर्व कपडे उतरवल्याचे सांगण्यात येत आहे. दार्जा तुचिन्स्की, वय २८असे या महिलेचे नाव आहे. बालीमधील एका मंदिरात प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर या महिलेने हे विचित्र पाऊल उचलले आहे. मंदिरात प्रवेश करताना तुस्चिन्स्कीने सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की केली आणि निषेध म्हणून स्वत: ला नग्न केले. आपले कपडे काढल्यानंतर तिने मंदिराचे मोठे गेट उघडण्यासाठी धाव घेतली. दरवाजा उघडून ती आत गेली व गुडघे टेकून प्रार्थना करण्याच्या स्थितीत बसली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – आनंद महिद्रांनी ट्विटरवर Video शेअर करत दिला महत्त्वाचा मेसेज; म्हणाले, ”संकट की संधी…’

त्यानंतर मंदिराच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आणि तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman eneter stripped naked in temple in bali after incidence women arrested video viral on soial media srk