आजकाल ऑनलाइन फसवणूक करणारे लोक वेगवेगळ्या युक्त्या वापरून लोकांची फसवणूक करताना दिसतात. त्यात हल्ली व्हॉट्सअॅपवर पोलिसांच्या गणवेशातील फोटो ठेवत, त्यावरून लोकांना कॉल करीत आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाण वाढताना दिसतेय. यात लोकांना आपण पोलीस असल्याचे भासवून फसवणूक करणारे लोक कारवाईची धमकी देताना दिसतात. त्यानंतर तडजोडीच्या नावाखाली मोठी रक्कम वसूल केली जाते.

नुकताच एका तरुणीबरोबर फसवणुकीचा असाच प्रकार घडला; मात्र तिने न घाबरता या फसवणुकीचा डाव उघडकीस आणला; ज्याचा व्हिडीओ तिने सोशल मीडिया साईट्सवर पोस्ट केला. त्यामुळे तुम्हीही ही बातमी शेवटपर्यंत वाचा आणि अशा प्रकारे होणाऱ्या या फसवणुकीपासून सावध राहा.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”

तरुणीला आला पोलिसांच्या नावे बनावट कॉल

चरणजित कौर, असे या तरुणीचे नाव आहे. तिला व्हॉट्सअॅपवर पोलिसांचा डीपी असलेल्या अकाउंटवरून एक कॉल येतो; ज्यात तिला फसवणूक करणारी व्यक्ती सांगते की, चरणजित कौरला पोलिसांनी अटक केलीय. त्यावर ती तरुणी सांगते, “कृपया मला चरणजित कौरशी बोलायला द्या. पण, फसवणूक करणारी व्यक्ती तरुणीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत विचारते, “चरणजित कौर तुमची कोण लागते?” त्यावर ती सांगते, “माझी बहीण…” त्यावर ती व्यक्ती पुन्हा एक प्रश्न विचारते, “तुझी बहीण आता कुठे आहे?” उत्तरात तरुणी सांगते, “ती नुकतीच कुठेतरी बाहेर गेली आहे, दिल्लीच्या आसपास.”

तरुणी आपल्या जाळ्यात फसल्याचे मानत फसवणूक करणारी व्यक्ती पुढे सांगते की, “तो दिल्ली सदर पोलीस ठाण्यातून बोलत आहे. तुमच्या बहिणीला नुकतीच अटक झाली आहे.” त्यावर ती तरुणी विचारते, “चरणजित कौरला का अटक करण्यात आली?” त्यावर ती फसवणूक करणारी व्यक्ती सांगू लागते की, “तुमच्या बहिणीवर तीन-चार मुलींसह मिळून मंत्र्याच्या मुलाची फसवणूक करून, ३५ ते ४० लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. याबाबत तुम्ही कोणाला सांगितल्यास हे प्रकरण माध्यमांसमोर येईल आणि तुमच्या बहिणीची देशभरात बदनामी होईल. तुझ्या बहिणीने तुझा नंबर दिला म्हणून तुला फोन केला.” पण, पोलीस कोणत्याही केससंदर्भात अशा प्रकारे फोन करून धमकीची भाषा वापरत नाहीत. त्यामुळे हा फेक कॉल असल्याचे तरुणीच्या लक्षात येते. तरीही ती पुढे फसवणूक करणाऱ्या व्यक्तीसह बोलत राहते.

हेही वाचा – “ते शिवीगाळ करून जबरदस्तीने…” भररस्त्यात तरुणीला पाठलाग करून घाबरवण्याचा प्रकार; पाहा घटनेचा धक्कादायक VIDEO

यावेळी ती त्या व्यक्तीला “मला एकदा चरणजित कौरबरोबर बोलायचे आहे. तिच्याकडे कॉल द्या”, असे सांगते. त्यावर ती व्यक्ती नकार देत तडजोडीची भाषा करू लागते. तो सांगतो, “तुम्ही तडजोड केली, तर ठीक; नाही तर आम्ही तिला घेऊन जात, तिच्याविरोधात मोठी दंडात्मक कारवाई करू. त्यात तिला कमीत कमी १५ वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. आमच्याकडे जास्त वेळ नाही.” त्यावर ती तरुणी विचारते, “किती तडजोड करू शकता?” यावर उत्तर देत ती व्यक्ती सांगते, “तुम्हाला आधी ३० हजार रुपये द्यावे लागतील. तेही ऑनलाइन. तुम्ही देऊ शकत असाल, तर ठीक नाही तर आम्ही तिलाबरोबर घेऊन जात आहोत. तुमची बहीण इथे रडत आहे. ती म्हणतेय की, मला कोणाशीही बोलायचे नाही. माझ्या बहिणीला सांगा की, तिला जमेल तसे मला सोडव. पण, कृपया मला येथून घेऊन जा.”

सर्व गोष्टी ऐकून घेतल्यानंतर अखेर तरुणी फसवणूक करणाऱ्या बनावट पोलिसांचा डाव उघड करते. ती तरुणी संतापलेल्या अवस्थेत फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला सांगते, “तुला अशी एक कानाखाली वाजवेन ना. मला वेडा बनवतोयस का? मीच चरणजित कौर बोलत आहे.”

दरम्यान, तरुणीने या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ बनवून इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे- “पोलिसांचा डीपी पाहून लोक घाबरतात आणि मग विचार न करता, घाईघाईत पैसे ट्रान्स्फर करतात आणि या प्रक्रियेत फसवणुकीचे बळी ठरतात. मला या फसवणुकीबद्दल माहिती होती. त्यामुळे मी वाचले. कृपया हे तुमच्या सर्व कुटुंबीय आणि मित्रांना शेअर करा; जेणेकरून ते असे घोटाळे टाळू शकतील.”

Story img Loader