Woman Falls From 3rd Floor While Joking Aroun With Friends Dies Video : मित्रांमध्ये थट्टा-मस्करी ही रोजची असते. मित्रांमध्ये हसणे आणि विनोद करणे हे चालूच असते. पण, अनेकदा मस्करी करताना मस्करीची कुस्करी होते आणि होत्याचं नव्हतं होऊन बसतं. अशाचप्रकारे मित्राबरोबर मस्करी करणे एका महिलेला महागात पडले, ज्यामुळे तिला आपला जीव गमवावा लागला. मित्रांबरोबर मस्करी करत असताना तिसऱ्या मजल्यावरून ती खाली पडली अन् तिचा मृत्यू झाला. डोंबिवलीमध्ये मंगळवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली.

मृत महिला पिसवली टाटा नाका परिसरात आपल्या कुटुंबासह रहात होती. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी तक्रार नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

case registered against two people,young man died due to electric shock in pune
पुणे : फलक लावताना विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू, दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Girls Found Hanging in uttar pradesh
Crime News : धक्कादायक! जन्माष्टमीच्या कार्यक्रमासाठी गेल्या अन् दुसऱ्या दिवशी झाडावर आढळले मृतदेह, दोन मुलींच्या मृत्यूमुळे खळबळ
uttarakhand police news cow meat
Cow Meat Smuggling Suspect Died: …आणि जमावानं पोलिसांची आख्खी तुकडीच ठेवली ओलीस, केली धक्काबुक्की; उत्तराखंडमध्ये गोमांस तस्करीच्या आरोपावरून जमाव संतप्त!
Crime News Varanasi
Crime News: ‘तू माझा नाही तर कुणाचाच नाही’, चिडलेल्या प्रेयसीचे धक्कादायक कृत्य; प्रियकराच्या पत्नीला…
Man arrested, Man molesting girl,
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला अटक
Man Liquor bottles hidden in cardboard books
खतरनाक जुगाड! पठ्ठ्यानं चक्क पुस्तकात लपवल्या मद्याच्या बाटल्या; VIDEO पाहून तुम्हीही माराल कपाळावर हात
An inmate attacked another inmate in Aadharwadi Jail in Kalyan
कल्याणमधील आधारवाडी तुरूंगात एका कैद्याचा दुसऱ्या कैद्यावर हल्ला

डोंबिवली पूर्व, कल्याण-शीळ रोडवर विकास नाका परिसरात ग्लोब स्टेट नावाची इमारत आहे. या इमारतीमधील एका कार्यालयात नगीनादेवी मंजिराम ही महिला साफसफाईचे काम करते. नगीनादेवी डोंबिवली पूर्वेतील पिसवली परिसरात राहते. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

मस्ती करताना जिन्यावरून तोल गेला अन्….

मंगळवारी दुपारच्या सुमारास नगीनादेवी तिच्या सहकाऱ्यांसोबत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जिन्याजवळ बसली होती. ती बसली असताना तिचा सहकारी तिच्यासोबत मस्करी करीत होता. याचदरम्यान तिच्या सहकाऱ्याचा हात तिला लागला आणि तोल गेल्याने क्षणार्धात नगीनादेवी तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली.

नगीनादेवी मंजिराम असे या मृत महिलेचे नाव असून ती डोंबिवलीत ग्लोब स्टेट नावाच्या इमारतीत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होती. याचवेळी बंटी नावाचा एक तरुण महिलेबरोबर मस्करी करत होता. पण, चेष्टा-मस्करी करत असताना महिलेसह त्या तरुणाचाही तोल गेला. यावेळी महिला थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळली, पण तरुणाला तिथे असलेल्या लोकांनी कसेबसे वाचवले. या प्रकरणाची माहिती मिळताच मानपाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

या घटनेच्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, इमारतीमध्ये साफसफाई करणारे दोन ते तीन कर्मचारी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर चेष्टा-मस्करी करत होते. यावेळी मस्करीत बंटी टाक नावाच्या सफाई कर्मचाऱ्याने आपल्याबरोबर काम करणाऱ्या नगीना देवी हिला हात लावला, नगीना देवी यावेळी एका कठड्यावर बसणारच होत्या, पण त्या कर्मचाऱ्याचा जोरात हात लागल्याने त्यांचा तोल गेला आणि त्या जोरात खाली कोसळल्या, बंटी टाक याचाही यावेळी तोल गेला, पण तो थोडक्यात बचावला. परंतु, नगीना देवी ही तिसऱ्या मजल्यावरून पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी बंटी टाक विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास मानपाडा पोलिस करत आहेत.