पुण्यातील पोर्श कारच्या अपघाताचे प्रकरण तापलेले असताना मुंबई-बंगळुरू महामार्गावरील आणखी एका अपघाताचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. दरम्यान अपघात करणाऱ्या कारचालला औपचारिक तक्रार नसल्याचा कारण देत हिंजवडी पोलिसांनी सोडून दिले. २३ मे रोजी घडलेला हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एक वेगात जाणाऱ्या एका कारणे महामार्गावर रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या एका महिलेला जोरात धडक दिली. धडक इतकी जोरात बसली होती की महिला अक्षर: हवेत उडून काही अंतर पुढे जाऊन पडली आणि कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकात घुसली.. अपघाचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येऊ शकतो. पुण्यातील हिंजवडी पोलिसांच्या हद्दीतील भुजबळ चौकात ही घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊनही महिला व तिच्या नातेवाइकांनी फिर्याद दिली नाही. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, हिंजवडी पोलिसांनी सांगितले की,”महिलेला मोठी दुखापत झाली नाही, आणि म्हणून तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी ड्रायव्हरविरुद्ध तक्रार न करणे पसंत केले.”

हेही वाचा – “कॅनडा मेट्रो स्टेशन की, दादर रेल्वे स्टेशन? Viral Videoमुळे पेटला नवा वाद, नेटकऱ्यांनी स्थलांतरीत भारतीयांवर व्यक्त केला राग

पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरण काय आहे?

हिंजवडी येथील अपघाताची घडना कल्याणीनगर येथे १९ मे रोजी झालेल्या भीषण पॉर्श अपघातानंतर घडली. हे प्रकरण अद्यापही चर्चेत आहे. एका भरधाव वेगाने येणाऱ्या पोर्श कारने एका दुचारी स्वाराला धकड दिली होती. या अपघातात दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता पंजाबच्या मोहालीतही अशा प्रकारचा अपघात घडला आहे.

पोर्शे प्रकरणात, पुणे न्यायालयाने सोमवारी अल्पवयीन मुलाच्या पालकांच्या पोलिस कोठडीत वाढ केली आणि पुरावा नष्ट करण्याच्या प्रकरणात आणखी एका आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ केली. तपासाची दिशाभूल करण्यासाठी अल्पवयीन मुलाने त्याच्या रक्ताचे नमुने त्याची आई शिवानी अग्रवाल यांच्या रक्ताचे नमुने बदलून घेतले.

हेही वाचा – शेतात पडली वीज अन् निळ्या रंगाचं झालं पाणी? काय आहे Viral Videoचं सत्य

शिवानी अग्रवाल आणि तिचा पती विशाल अग्रवाल यांना पुराव्याशी छेडछाड केल्याच्या संशयास्पद भूमिकेसाठी अटक करण्यात आली होती. पीटीआयच्या वृत्तानुसार, पोलिसांनी आरोप केला आहे की या जोडप्याने अश्पाक मकानदार नावाच्या मध्यस्थांसह ससून रुग्णालयातील डॉक्टरांना अल्पवयीन मुलाचे रक्त नमुने बदलण्यासाठी ४ लाख रुपये दिले. “डॉ. श्रीहरी हलनोर आणि ससून हॉस्पिटलचे कर्मचारी अतुल घाटकांबळे यांच्याकडून ३ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित १ लाख रुपये आम्हाला परत मिळवायचे आहेत,” असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यांनी मूळ रक्ताचे नमुने नष्ट केल्याची शक्यता असल्याने पालकांची कोठडीत चौकशी करणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. “मध्यस्थ, मकंदर याला किशोरच्या वडिलांच्या ड्रायव्हरने रक्ताचे नमुने बदलण्यासाठी पैसे दिले होते,” असे फिर्यादीने न्यायालयाला सांगितले.

बचाव पक्षाचे वकील प्रशांत पाटील यांनी कोठडी वाढविण्यास विरोध केला, कारण पालकांनी आधीच अनेक दिवस पोलिस कोठडीत काढले होते आणि आणखी काही काळ ताब्यात ठेवणे गैर होते. अल्पवयीन मुलगा सध्या निरीक्षण गृहीत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman flung in air as speeding car hits pedestrian in pune caught on cam no police complaint lodged snk