सुरवातीला कानामध्ये खाज सुटल्यासारखे होऊन, नंतर कानात काहीतरी असल्यासारखा आवाज कॉन्टेन्ट क्रियेटर आणि पार्ट-टाइम शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या लूसी वाईल्डला ऐकू येऊ लागला. सुरवातीला हा कानातील मळ असेल असे स्वतःला सांगून तिने दुर्लक्ष केले. मात्र, दिवसा अखेरीस कानात एखादा किडा असल्याची शक्यता तिला जाणवू लागली.
आपल्या कानात नेमके काय आहे हे पाहण्यासाठी लूसीने कान साफ करणाऱ्या ‘स्मार्ट क्यू टीप’चा वापर केला. या क्यू टीपच्या शेवटी एक छोटासा कॅमेरा असल्याने कानात काय आहे हे पाहण्यासाठी लूसीला मदत होणार होती. या मशीनच्या साहाय्याने शेवटी लूसीला तिच्या कानामध्ये एक कोळी असल्याचे समजले. अशी माहिती, न्यू यॉर्क पोस्टच्या एका लेखावरून मिळते.
“हा कोळी माझ्या कानाच्या आतपर्यंत गेलास कसा हे मला समजत नाही.” असे २९ वर्षाच्या लूसी वाईल्डने साऊथ वेस्ट न्यूज र्सव्हिसला तिच्या कानात घर करून राहणाऱ्या आठ पायांच्या कोळ्याबद्दल माहिती देताना सांगितले.
हेही वाचा : बापरे! कानात कसेतरी होतेय म्हणून डॉक्टरांना दाखवले, तर सापडला कोळी…
“मी त्या कोळ्याला कानाबाहेर काढण्यासाठी कितीतरी वेळा कानाला झटके दिली. युनायटेड किंग्डममध्ये वापरला जाणारा १११ या आपत्कालीन क्रमांकावरदेखील फोन केला. शेवटी थोडे ऑलिव्ह तेल कोमट करून ते कानात घातले आणि त्या कोळ्याला बाहेर काढले. त्या तेलामध्ये भिजलेल्या कोळ्याचा आकार साधारण माझ्या करंगळीच्या नखाएवढा असेल [साधारण १ सेंटीमीटर].” अशी माहिती लूसीने दिली.
त्या स्त्रीने जरी यशस्वीरीत्या कोळ्याला कानाबाहेर काढले असले तरीही, तिच्या कानातून थोडे रक्त येत होते. सोबतच ऐकण्यातही थोडा त्रास होत होता. त्यामुळे लूसीने तातडीने डॉक्टरांची मदत घेतली. त्यांनीही तिला आठवड्याभराची औषधं लिहून दिली होती. डॉक्टरांनी तपासून झाल्यानंतर आता काळजी करण्याचे कारण नाही असे तिला वाटत होते.
मात्र, पुन्हा एकदा लूसीचा कान दुखण्यास सुरवात झाली. तिने पुन्हा एकदा आपल्या स्मार्ट कान साफ करणाऱ्या मशीनचा वापर करून आपल्या कानात अजून खोलवर काही आहे हे तपासले आणि तिला धक्काच बसला. कानाची आतील बाजू कुठल्यातरी काळसर रंगाच्या गोष्टीने भरलेली होती. तिने तातडीने कान-नाक-घास [ENT] विभागाकडे धाव घेतली. तिचा कान तपासल्यावर डॉक्टरांनी लूसीला अतिशय भयंकर असे निदान संगीतले.
“डॉक्टरांनी मला माझ्या कानामध्ये, कोळ्याचे जाळे/घर असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी याआधी असे कधी काही पाहिले नव्हते.” असेही लुसीने माहिती देताना सांगितले. “कानामध्ये कोळी जातो आणि ते कळतही नाही असे कसे शक्य आहे?” असा प्रश्न तिने डॉक्टरांना केला.
आता डॉक्टारांनी तिचा कान व्यवस्थित साफ केला असला तरीही या सर्व प्रकारामुळे लूसी मनातून अतिशय हादरली असून, कानातून जाळे काढतांना त्याचा त्रास हा एखाद्या बाळाला जन्म देताना होतो त्याहूनही जास्त झाला होता असे सांगते.
हेही वाचा : रॅपीडो ड्रायव्हर निघाला चक्क ‘कॉर्पोरेट मॅनेजर’!! सोशल मीडियावर व्हायरल झालेली ‘ही’ पोस्ट पाहा
“हा संबंध प्रकार इतका विचित्र आहे कि नेमके त्या कोळ्याने कानाच्या आत जाळे कसे बनवले याबद्दल मला अजूनही प्रश्न पडला आहे. मला माहीत आहे, काही कोळ्यांच्या पायावर आणि पाठीवर त्यांची पिल्लं घेऊन असतात. बरं तो कानामध्ये जात असताना मला समजलेदेखील नाही. माझ्या कानामध्ये अजून कोळी तर नसतील ना अशी मला भीती वाटत असते.” असे लूसीने एसडब्ल्यूएनएसला [SWNS] माहिती देताना सांगितले आहे.