महाराष्ट्रात प्रत्येक व्यक्तीचा लाडका पदार्थ म्हटला की, गरमागरम वडापावचे नाव सर्वांच्या ओठांवर येते. मस्त एक कप ताजा चहा, तिखट-गोड चटणी लावलेला वडापाव आणि त्यासह एखादी मिरची हा अनेकांचा संध्याकाळचा ठरलेला नाश्ता असतो. हा वडापाव म्हणजे मुंबईकरांचा जीव की प्राण. मात्र, नाशिक शहरात एक अतिशय खास नावाचा आणि विशेष पद्धतीने बनवला जाणारा वडापाव सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरागणिक या लोकप्रिय खाद्यपदार्थाच्या चवीत आणि बनविण्याच्या पद्धतीत थोडेफार बदल होत असतात. असे असले तरीही सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका व्हिडीओमध्ये वडापाव बनवणारी महिला कोणत्याही झाऱ्याचा किंवा तळण काढण्याच्या वस्तूचा वापर करीत नाहीये, असे पाहायला मिळते. त्यामुळे वडापाव आणि तो बनवण्याच्या पद्धतीवर नेटकऱ्यांच्या खूप मिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. मात्र, असे का ते पाहा.

हेही वाचा : आठवणीत राहणारे लग्न! मुहूर्ताची वेळ चुकू नये म्हणून नवरीने लढवली भन्नाट शक्कल, Video पाहा…

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @thefoodiehat अकाउंटने या ‘उलटा वडापाव’चा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानुसार सुरुवातीला महिला आपली वडापावची हातगाडी लावून घेते. त्यानंतर त्यामध्ये स्टोव्हवर मोठी कढई ठेवून, त्यात तेल ओतून तापवण्यास ठेवते. नंतर उलटा वडापावची तयारी करून घेते. त्यामध्ये वड्याचे पीठ बनवून तयार करते. मग पुढे आकाराने थोड्या मोठ्या असणाऱ्या पावाला सुरीने मधोमध कापून, त्यामध्ये वड्याची भाजी आणि चीज घालून पाव हाताने चेपून बंद करते. आता तो पाव वड्याच्या तयार केलेल्या पिठामध्ये बुडवून सबंध पाव तळण्यास कढईत सोडते.

हा पदार्थ बनवणारी महिला तयार झालेला हा उडता वडापाव गरमागरम तेलातून चक्क हाताने तळून काढून, एका कागदी डिशमध्ये काढून घेते. मग त्याचे सुरीने तुकडे करून, मधोमध कोरडी लाल चटणी आणि हिरवी मिरची घालून तो पदार्थ खाण्यासाठी देते. मात्र, हे सर्व करताना ती हातात कोणत्याही प्रकारचे ग्लोव्हज घालत नाही; तसेच कोणताही डाव, झारा अशा गोष्टींचाही वापर करीत नाही. हे या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो.

हेही वाचा : Viral video : रुबिक्स क्यूबच्या मदतीने साकारले प्रभू श्रीराम! पाहा ११ वर्षांच्या या मुलाची अद्भुत कला…

याच मुद्द्यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली असून, त्यांचे नेमके म्हणणे काय आहे ते पाहा.

“बाई… मला त्या हातांची दया येत आहे,” अशा आशयाची प्रतिक्रिया एका व्यक्तीने दिली आहे. दुसऱ्याने, “हेच जर एखाद्या पुरुष विक्रेत्याने केले असते, तर स्वच्छतेवरून किती नावे ठेवली असती त्याला.” असे म्हटले आहे. तिसऱ्याने, “कृपया तुमची नखे कापा मॅडम”, असे लिहिले आहे. चौथ्याने, “जे कोणी हायजिन आणि स्वच्छतेबद्दल बोलत आहेत, त्यांच्या घरीसुद्धा ते स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला हातात ग्लोव्हज घालायला सांगतात का,” असा प्रश्न केला आहे. तर शेवटी पाचव्याला, “अरेच्चा! पण त्या बाईच्या हाताला भाजत नाहीये का? काही जाणवत नाहीये का,” असा प्रश्न पडला आहे.

‘हीट प्रूफ वुमन ऑफ नाशिक’ असे कॅप्शन लिहून शेअर केलेल्या आणि व्हायरल होणाऱ्या उलटा वडापावच्या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर आतापर्यंत २६.७ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman frying vadapav with bare hands video went viral on social media watch this nashik special ulta vadapav dha
Show comments