बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीचा आपल्यापैकी अनेकावर खूप मोठा प्रभाव आहे. बॉलीवूड चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी लोकांना खऱ्या आयुष्यात करायच्या असतात. कोणाल हिरो-हिरोईनप्रमाणे नाचायचे असते तर कोणाला हिरो-हिरोईनप्रमाणे सुंदर कपडे परिधान करून मिरवायचे असते. अनेक बॉलीवूड चाहत्यांच्या मनात अशी अनेक स्वप्न दडलेली असतात जी कधीतरी पूर्ण व्हावी अशी इच्छा त्यांच्या मनात असते. एका महिलेने आपले हे स्वप्न पूर्ण केले आहे. मनालीमध्ये फिरायला गेलेल्या एका महिलेने चक्क श्रीदेवीप्रमाणे डान्स केला आहे. महिलेचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. १ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
मनालीच्या प्रवासादरम्यान एका महिलेने आयुष्यभर लक्षात राहतील अशा आठवणी निर्माण केल्या आहेत. महिलेला या प्रवासादरम्यान ४० वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली. कन्टेंट क्रिएटर अवी वाडेकर यांनी एका व्हिडिओमध्ये आपल्या आईचा व्हिडीओ शेअर केला आहे. बॉलीवूड हिरोईनप्रमाणे डोंगरामध्ये नाचण्याचे आपल्या आईचे स्वप्न पुर्ण करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे.
हेही वाचा – उन्हाळ्यात बर्फ टाकून मळा कणीक! पाहा काय होईल कमाल, Kitchen Jugaad एकदा वापरून बघा
चमकदार लाल साडी नेसून आवीच्या आईने हिमाचल प्रदेशातील नयनरम्य डोंगरामध्ये श्रीदेवीच्या आयकॉनिक चार्टबस्टर ‘तेरे मेरे होंटों पे’ या गाण्यावरवर नृत्य केले. व्हिडीओ पाहून लक्षात येते की महिलेसाठी अनुभव नक्कीच अविस्मरणीय क्षण होता.व्हिडीओ शेअर करताना अवीने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “तुमचे स्वप्न पूर्ण करताना वय हा फक्त एक आकडा ठरतो.”
हेही वाचा – तुम्ही तुमचा टूथब्रश कुठे ठेवता? बाथरूममध्ये टूथब्रश ठेवणाऱ्यांना तज्ज्ञांचा इशारा
व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. अनेकांनी आईचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल लेकाचे कौतूक केले आहे. एकाने लिहिले,”माझ्या आईसाठी मला असाच व्हिडीओ बनवायचा आहे.” दुसऱ्याने लिहिले, जगातील सर्वात आनंदी आई,तिचा मुलगा तिला आनंदी ठेवण्यासाठी सर्वकाही करत आहे.”
तेरे मेरे होंटों पे’ हे गीत बॉलीवूडची प्रसिद्धी अभिनेत्री श्रीदेवी आणि अभिनेता ऋषी कपूर यांच्या मुख्य भुमिका असलेल्या १९८९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चांदणी’ या चित्रपटातील आहे जे आजही तितकेच लोकप्रिय आहे. हे गाणे शिवकुमार आणि हरीप्रसाद चौरसिया यांनी संगीतबद्ध केले होते आणि गाण्याला लोकप्रिय गायिका लता मंगेशकर आणि गायक बबला मेहता यांनी आवाज दिला आहे.