Woman Trying To Kiss Snake And Gets Bite on Face : साप समोर दिसला की अनेकांच्या अंगावर काटा येतो. पण काही लोकांना सापासोबत मस्ती करायला आवडतं. पण सापांशी केलेली मस्ती कधी अंगलट येईल याचा अंदाज लावता येणार नाही. सापाला बघितल्यावर अनेकांच्या अंगावर शहारा येतो पण एका तरुणीने स्वत:चा जीव धोक्यात टाकून चक्क खतरनाक सापाला किस करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पिसाळलेल्या सापाने काही सेकंदातच तरुणीला चावा घेतला. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. प्राण्यांना स्वतंत्रपणे जगू द्या आणि त्यांच्यापासून चार हात लांब राहा, अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी व्हिडीओ पाहिल्यानंतर दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, दोन व्यक्ती एका खतरनाक सापाला हाताळत असतात. त्यांच्याजवळ उभी असलेली एक महिला पर्यटक त्या सापाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करते. ती महिला सापाला चक्क किस करण्याचा प्रयत्न करते अन् काही सेकंदातच होत्याचं नव्हतं झालं, हे व्हिडीओत दिसत आहे. कारण सापाला किस केल्यानंतर साप लगेच त्या तरुणीला चावा घेतो.

नक्की वाचा – सततच्या ट्र्रॅफिकचा आला कंटाळा! Zomato फूड डिलिव्हरीसाठी चक्क ड्रोनच बनवला, जुगाडाचा व्हिडीओ व्हायरल

इथे पाहा सापाचा खतरनाक व्हिडीओ

चेहऱ्यावर चावा घेतल्यानंतर महिलेला तातडीनं उपचार घेण्यासाठी सांगितलं जातं. हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला असून लाखो व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत.व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने म्हटलं, याच कारणामुळे मी वन्य प्राण्यांवर विश्वास ठेवत नाही. दुसरा यूजर म्हणाला, अरे देवा! हे खूप भयानक आहे. सापांसोबत खेळ करून जीव धोक्यात टाकणाऱ्या अनेक लोकांचे व्हिडीओ समोर आले आहेत. काही माणसांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. कारण सापसारखा विषारी प्राणी संधी मिळताच चावा घेतो आणि माणसांचा जीव धोक्यात टाकतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman gets bite on her face while trying to kiss dangerous snake terrible video clip went viral on instagram nss