सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या महाराष्ट्रातील नवी मुंबई येथे एका दुकानातील थरारक अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुकाना साफसफाई करणाऱ्या एका महिलेच्या अंगावर अचानक काही धान्यांनी भरलेली पोती कोसळली. जवळपास ३०-४०धान्याच्या पोत्यांखाली अडकली. पण सुदैवाने दुकानातील कामगारांच्या प्रंसगवाधनामुळे महिलेचा जीव वाचला

वाशी परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) मार्केटमधील एका दुकानात ही घटना घडली. अंगावर काटा आणणारी घटन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सोशल मीडियावर या थरारक घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ एका धान्याच्या दुकानातील आहे. व्हिडीओमध्ये धान्याने भरलेली पोती एकमेकांवर ठेवलेली दिसत आहे. एक सफाई करणारी महिला दुकानात झाडू मारत असताना अचानक तिच्या अंगावर धान्यांची ३०-४० पोती अचानक कोसळली. महिलेला काही कळण्याआधी ती पोत्यांखाली दाबली गेली. तिने मदतीसाठी आराडोओरडा केल्याचे दुकानातील कामगारांच्या लक्षात आले. ताबडतोब चार पाच कामगार तेथे धावत आले आणि झटपट पोती हटवून महिलेला बाहेर काढले.

Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Manghar Transformation into India First Honey Village in crisis
महाबळेश्वरमधील ‘मांघर’च्या मधमाश्यांवर संकट
Fire Lonar Rural Hospital, Lonar Rural Hospital Patient died,
बुलढाणा : लोणार ग्रामीण रुग्णालयात अग्नितांडव, रुग्णाचा बेडवरच कोळसा; विडीमुळे…
pune dumper crushed people on footpath
पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या तिघांना मद्यधुंद डंपर चालकांने चिरडले, तीन जण ठार तर सहा जण जखमी
jewellery shop employee dies in shooting
शहापूर हादरले! सराफाच्या दुकानातील कर्मचाऱ्याचा गोळीबारात मृत्यू
death of young man walking with a Jain Sadhvi in accident
जैन साध्वी सोबत चालत जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू
Firing on saraf shop worker in Shahapur
शहापुरातील सरफच्या दुकानातील कामगारावर गोळीबार

हेही वाचा – IIT, IIMमधून घेतले शिक्षण, १ कोटीची नोकरी नाकारून उभारली ३०० कोटींची कंपनी!…

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी महिलेचा जीव वाचवणाऱ्या कामगारांचे कौतूक केले. “किती झटपट त्यांनी समन्वय साधाला. सर्वांना सलाम” असे एकाने लिहिले. “जेव्हा माणुस जेव्हा माणसासारखा वागतो तेव्हा ते सर्वात सुंदर असतात.” असे दुसऱ्याने लिहिले. तिसऱ्याने लिहिले, हे माणसाचे सौंदर्य आहे. तो नेहमी प्रतिक्रिया देतो आणि एका सेकंदाचाही विचार न करता संरक्षण करतो! हे जग पुरुषांशिवाय काम करणे थांबवेल!”

हेही वाचा – हातात CD घेऊन भल्या मोठ्या कागदाच्या गठ्ठ्यावर बसले बिल गेट्; या ३० वर्षांपूर्वीच्या फोटोमागे आहे एक रंजक किस्सा!

व्हिडीओच्या कमेटंमध्ये दिलेल्या माहितीनुसाप महिलेला किरकोळ दुखापत झाली असून तिला माथाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Story img Loader