एलिअन्स हा एक असा विषय आहे ज्याबद्दल जाणून घेण्यात प्रत्येक माणसाला रस आहे आणि शास्त्रज्ञही सतत त्यांचा शोध घेत आहेत. परंतु सर्व दावे आणि अनेक कथित व्हिडीओंनंतरही, तपासण्यायोग्य पुराव्यांअभावी एलियन्स हे आजही एक गूढच आहे. आजवर ‘दुसऱ्या ग्रहावरील प्राणी’ आणि UFO बद्दल अनेक आश्चर्यकारक दावे करण्यात आले आहेत. परंतु आता एका महिलेने अत्यंत विचित्र आणि आगळावेगळा दावा केला आहे. हे आतापर्यंतचे सर्वात विचित्र प्रकरण असल्याचे दिसते. एका एलियनला भेटल्यानंतर ती गरोदर राहिल्याचे या महिलेचे म्हणणे आहे.

‘Anomalous Acute And Subacute Field Effects on Human and Biological Tissues’ म्हणजेच ‘मानवी आणि जैविक ऊतींवर विसंगत तीव्र आणि सबक्युट फील्ड इफेक्ट्स’ असे शीर्षक असणाऱ्या एका अहवालात अमेरिकन संरक्षण मंत्रालयाने ‘पॅरानॉमल अ‍ॅक्टिव्हिटी’ असल्याचा दावा करणाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी केली. यातील काही साधे, काही अतिशय विचित्र आणि एक प्रकरण ‘गूढ गर्भधारणा’चे होते. या अहवालात अशा काही प्रभावाची सूची समाविष्ट करण्यात आली होती जे एलियन किंवा यूएफओ जवळ आल्यावर जाणवू शकतात.

lon Musk Ambani government role in allocating spectrum for SATCOM print eco news amy 95
‘सॅटकॉम’साठी स्पेक्ट्रम वाटपाच्या सरकारच्या भूमिकेने अंबानींविरोधात मस्क यांना झुकते माप
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Capital gains and taxation on sale of house
घराच्या विक्रीवर झालेला भांडवली नफा आणि कर आकारणी
Akshays parents went to Ambernath Municipality for burial permission their application was not accepted
अक्षय शिंदेचे प्रकरण सत्ताधारी पुरस्कृत, मृत अक्षयच्या वकिलांचा आरोप
Anna Sebastian Perayil, EY,
शहरबात… ॲनाच्या मृत्यूच्या निमित्ताने…
Three Walking yoga types to Include in Your Morning Walk – Viral Video
तुम्ही दररोज मॉर्निंग वॉकला जाता? हे तीन प्रकार करा चालण्यात समाविष्ट, VIDEO एकदा पाहाच
Mercedes-Benz, Supriya Sule, Supriya Sule latest news,
मर्सिडिज बेंझला नोटीस देण्याच्या टायमिंगवर शंका; खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शासनाने…”
Nitish Kumar government
बिहारमध्ये ११४ वर्षांनंतर भूमी सर्वेक्षण; नितीश कुमार सरकारच्या निर्णयावर विरोधकांची टीका कशासाठी?

कॅनडामधील हरणांमध्ये सापडला धोकादायक विषाणू, लोकांमध्ये पसरण्याची उठलीय अफवा

यामध्ये जखम होण्यापासून ते अपहरण होण्यापर्यंत आणि ‘मृत्यू’ आणि ‘शारीरिक संबंध’ अशा पाच प्रकरणांचा समावेश आहे. यादीतील इतर अनुभवांमध्ये वाईट स्वप्ने, आवाज ऐकू न येणे, डोळ्यांना दुखापत, श्वास घेता न येणे आणि वजन कमी होणे यांचा समावेश होतो. डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी (DIA) कडून मिळालेल्या दस्तऐवजाचा हवाला देत द सनने हे निकाल प्रकाशित केले आहेत. अहवालानुसार, यामध्ये सरकारद्वारे तयार करण्यात आलेले वैज्ञानिक अहवाल आणि यूएफओ कार्यक्रमाशी संबंधित पेंटागॉनच्या पत्रांचा समावेश आहे.

Viral Video : पठ्ठ्याने विगच्या आत लपवलं होतं ‘इतक्या’ लाखांचं सोनं; कसा सापडला पोलिसांच्या जाळ्यात? पाहा…

अहवालानुसार, ‘बाहेरील विमानांशी संपर्क झाल्यामुळे’ अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी ४२ प्रकरणे वैद्यकीय फाइलमधील आहेत आणि ३०० प्रकरणे ‘अप्रकाशित’ आहेत, ज्यात लोक जखमी झाले आहेत. निकालाशी संबंधित कागदपत्रे सार्वजनिक झाल्यानंतर सोशल मीडियावर काहींनी त्याची खिल्ली उडवली. ट्विटरवर एका युजरने लिहिले की, ‘माझ्या मोठ्या पोटाचा अर्थ मी लठ्ठ नसून रहस्यमयपणे गर्भवती आहे.’