Viral Video: बाळाच्या जन्माबरोबर आईचा दुसरा जन्म होतो असं म्हणतात. घरात पाऊल टाकताच आई दिसली नाही की मुलांचा जीव कासावीस होतो. कधी हक्काने गप्पा गोष्टी करणारी मैत्रीण तर कधी हक्काने ओरडणारी या आईची सावली आयुष्यात खूप जास्त महत्वाची असते. आज सोशल मीडियावर याचे एक उत्तम उदाहरण पाहायला मिळालं आहे. आई तिच्या ऑटिस्टिक (स्वमग्न) मुलीला कथक नृत्य सादर करताना अगदीच खास पद्धतीत प्रशिक्षण देताना दिसून आली आहे…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, एका हॉलमध्ये नृत्य स्पर्धा सुरु असते. या नृत्य स्पर्धेत एक ऑटिस्टिक (स्वमग्न) मुलगी देखील सहभाग घेते. थोड्या वेळाने नृत्य सादर करण्याच्या स्पर्धेला सुरुवात होते आणि ऑटिस्टिक (स्वमग्न) मुलगी कथक नृत्यासह तिचे कौशल्य दाखवण्यास सुरुवात करते. तसेच मुलीची आई यादरम्यान स्टेजच्या अगदी समोर बसलेली दिसते आहे. आईचे डोळे तिच्या मुलीकडे असतात.आई डान्स स्टेप्स दाखवते आणि मुलगी हुबेहूब तिचे अनुकरण करताना दिसत आहे. उत्साही पारंपारिक नृत्य पोशाख परिधान केलेली मुलगी, चेहऱ्यावर हास्य ठेवून, एक-एक प्रत्येक पाऊल पुढे टाकत तिच्या आईकडे लक्षपूर्वक पाहते. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात चटकन पाणी आणेल. आई आणि लेकीच्या नात्याचा हा सुंदर व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघाच…

हेही वाचा…जागेवरून वाद, एकीने ओढले केस तर दुसरीने… धावत्या बसमध्ये भांडणाऱ्या ‘त्या’ दोन महिलांचा VIDEO बघाच

व्हिडीओ नक्की बघा…

मुलांच्या स्वप्नापुर्ती छंद जोपासण्यामध्ये आई-वडिलांचा पाठिंबा महत्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे मुलांचासुद्धा स्वप्न पूर्ण करण्याचा, छंद जोपासण्याचा आत्मविश्वास आणखी वाढतो. काही मुलं मेहनत, जिद्द यांच्या जोरावर त्यांचे स्वप्न पूर्ण करताना किंवा छंद जोपासताना दिसतात. हे पाहून आपल्या मुलांना पाठिंबा देणाऱ्या त्या प्रत्येक आई-वडिलांना मुलांचा अभिमान वाटतो. तर आज अशा स्वरूपाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ; ज्यामध्ये आपल्या स्वमग्न लेकीला नवनवीन कौशल्ये, संवाद-क्षमता, सुसंगत हालचाली, विकसित करण्यावर तिच्या पालकांनी (आईने) भर दिला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @apparrnnaa या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओला ‘एक आई तिच्या ऑटिस्टिक लेकीला नृत्य स्पर्धेत कथक सादर करण्यात मदत करते आहे … या विशेष मुलांचे संगोपन करण्यासाठी किती कष्ट, संयम आणि समर्पण आवश्यक आहे याची कल्पनाही करू शकत नाही! त्या मातेला सलाम ; अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून अनेक जण विविध शब्दात या व्हिडीओचे कौतुक करताना दिसत आहेत. तसेच स्पर्धेत कथक नृत्य सादर करणाऱ्या मुलीचेही कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.