रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यांची अवस्था फार दयनीय असते. त्यांना खायला व्यवस्थित अन्न मिळत नाही की प्यायला पाणी मिळत नाही. रस्त्यावर मिळेल ते खाऊन, कसलेही पाणी पिऊन ते जगत असतात. अशा भुकेल्या कुत्र्यांच्या मदतीला अनेकदा काही लोक धावून येतात. त्यांना खाऊ-पिऊ घालतात. असा एका तहानलेल्या कुत्र्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाणी पिण्यासाठी धरपडणाऱ्या कुत्र्याला मदत करताना एक महिला याव्हिडीओमध्ये दिसत आहे. महिलेच्या दयाळुपणाचे सर्वत्र कौतूक होत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी महिलेच्या दयाळूपणासाठी तिचे आभार व्यक्त केले आहेत.
व्हिडीओच्या सुरुवातीला एक भटका कुत्र्या नळाजवळ पाणी पिण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण नळ बंद असल्यामुळे त्याला व्यवस्थित पाणी पिता येत नाही. तेवढ्यात एक महिला येते आणि त्या तहानलेल्या कुत्र्याला पाहून नळ सुरू करते. कुत्रा आधी आश्चर्यचकित होऊन जातो पण लगेच पाणी पिऊ लागतो. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर give_india नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. पोस्टमधील कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, दयाळूपण अशी भेट आहे जो प्रत्येजण देऊ शकतो’
हेही वाचा – Optical Illusion Challenge : फोटोमध्ये लपला आहे एक कुत्रा! १० सेंकदात शोधून दाखवेल तोच खरा बुद्धिमान!
ही पोस्ट २ ऑगस्ट रोजी शेअर केली होती. पोस्ट केल्यापासून त्याला १५ हजारांहून अधिक वेळा लाईक करण्यात आले आहे. या शेअरवर अनेक कमेंट्सही येत आहेत.
हेही वाचा – अंड्यांमध्ये पिल्लू कसे तयार होते, माहिती आहे का? मग हा व्हिडीओ पाहाच, व्यक्तीने विचित्र प्रयोगातून दाखवले….
एका व्यक्तीने लिहिले, “तू खूप छान काम केलेस.” दुसर्याने लिहिले, “या मुलीला खूप प्रेम आणि धन्यवाद.” तिसऱ्याने पोस्ट केले, “देव तुम्हाला आशीर्वाद देईल.” चौथ्याने लिहिले, “मला ते आवडते. दयाळूपणाची किंमत लावता येत नाही, परंतु त्याचा अर्थ सर्वकाही आहे.” पाचवा म्हणाला, “कुत्र्याला मदत केल्याबद्दल धन्यवाद.”