Viral video: सोशल मीडियावर अनेक अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये स्कुटी चालवणाऱ्या महिला मुलींचेही अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यावरुनच मुलींना पापा की परी म्हणत चांगलंच ट्रोल केलं जातं. सध्या असाच एका स्कुटी चालवणाऱ्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तिच्या एका लहान चुकीमुळे पेट्रोल पंपावर वाहनांचा अपघात झालेला व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण पेट्रोल पंपवर उभा असलेला दिसत आहे. यावेळी सगळं नॉर्मल असताना अचानक एक महिला स्कूटीवरुन येते आणि तरुणाला जोरदार धडक देते. यावेळी तरुणाच्या चलाखीनं तो थाडक्यात बचावतो. तो उडी मारुन दुसऱ्या बाजूला जातो. महिलेचं स्कूटीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला आहे. सुदैवानं यामध्ये गंभीर जखमी झालेलं नाहीये. मात्र पेट्रोल पंपावर हा अपघात झाल्यानं मोठी दुर्घटना घडली असती.
यावेळी आजूबाजूला असलेले लोकही पुरते घाबरले होते, कारण अचानक हा अपघात घडला. मात्र यानंतर सर्वांनी या महिलेला मदत केली आणि तिला उचलंल.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> कारचा दरवाजा उघडला अन् बाईकवर बसलेल्याचा जीव गेला; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @HasnaZaruriHai या पेवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, ‘ओह नो’ तर आणखी एक युजरने मिस्कीलपणे लिहिले, “खूप वाईट झाले.”