गाडी चालवताना प्रत्येक चालकानं काही काळजी घेतली पाहिजे कारण जरासा निष्काळजीपणा मोठ्या संकटास कारणीभूत ठरू शकतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हि़डिओ व्हायरल होत आहे. एका महिला चालकानं स्वत:च्या निष्काळजीपणामुळे एक नाही तर चक्क तीन आलिशान गाड्यांचं नुकसान केलं आहे. पार्किंग लॉटमधून बाहेर पडताना या महिलेनं एक नाही तर ऑडी, मर्सिडीज, BMW अशा तीन महागड्या गाड्यांना  टक्कर दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या महिलेला पार्क केलेली गाडी मागे घेता येत नव्हती. आपली गाडी पार्किंगमधून बाहेर काढताना  सुरूवातीला तिनं मर्सिडीजला टक्कर दिली. काही केल्या गाडी मागे वळवता येत नसल्यानं ती त्रस्त होऊ गाडीबाहेर आली. पुन्हा एकदा ही महिला आपल्या गाडीत बसली आणि  गाडी मागे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी तिनं दोन गाड्यांना टक्कर दिली. यात तिच्या गाडीच्या मागे उभ्या असलेल्या ऑडी आणि BMWचं मोठं नुकसान झालं. तिन्ही गाड्यांना टक्कर दिल्यानंतर या महिलेनं कशीबशी गाडी चालवत पार्किंग लॉटमधून पळ काढला. तिची ही लबाडी पार्किंगमधल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

चीनमध्ये हा प्रकार घडला आहे. तिथली सोशल मीडिया साईट व्हिबोवर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.