Viral video: उत्तर प्रदेशातील बलिया येथील एक व्हिडीओ नुकताच चर्चेत आला होता. यामध्ये एक महिला एका व्यक्तीला पाहून त्याला आपला १० वर्षांपूर्वी हरवलेला पती समजून भावूक झाली होती. पण आता त्या प्रकरणाला एक नवं वळण आलं आहे. यूपीमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. हे संपूर्ण प्रकरण बलिया जिल्ह्यातील सुखपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवकाली येथील आहे. दहा वर्षांनंतर बायकोने ज्याला आपला नवरा समजून घरी आणले मात्र, तो दुसराच कोणीतरी निघाला. यामुळे नवरा-बायकोच्या कथेत नवा ट्विस्ट आला आहे. खरं तर, शुक्रवारी यूपीच्या बलिया जिल्हा रुग्णालयात जानकी नावाच्या महिलेने एका व्यक्तीला विचीत्र अवस्थेत पाहिले आणि जानकीने त्याला तिचा पती मोती म्हणून ओळखले आणि नंतर त्याला घरी आणले.
१० वर्षांनी नवरा मिळाला! पण…
पण नंतर मोतीचंदच्या अंगावर आधीच्या खुणा शोधण्याचा प्रयत्न केला असता त्या खुणा दिसत नव्हत्या, त्यानंतर जानकीला शंका आली की, ती व्यक्ती आपला पती मोतीचंद नसून दुसरी कोणीतरी आहे. त्यानंतर त्या व्यक्तीची चौकशी केली असता तो मोतीचंद नागरा पोलीस स्टेशन हद्दीतील राहुल असल्याचे समोर आले. यानंतर गावातील प्रमुख व काही लोकांनी राहुलच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून राहुलला त्यांच्या ताब्यात दिले.
बलिया जिल्ह्यातील कोतवाली भागातील देवकाली येथील रहिवासी असलेले ४५ वर्षीय मोतीचंद वर्मा यांचे २१ वर्षांपूर्वी जानकी देवीसोबत लग्न झाले होते, त्यांना तीन मुले होती. काही दिवसांनी त्यांची मानसिक स्थिती बिघडली आणि मोतीचंद्र वर्मा घराबाहेर पडले, त्यानंतर ते पु्न्हा घरी आलेच नाहीत. पत्नीने नातेवाइकांच्या मदतीने खूप शोध घेतला मात्र त्यांचा कुठेही शोध लागला नाही. त्यानंतर तन्ही मुलांचा सांभाळ देवकाली यांनी एकटीने केला.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – निवृत्तीनंतर ‘लॅम्बोर्गिनी’ खरेदी करणाऱ्या वृद्धाचा आनंद गगनात मावेना, हृदयस्पर्शी VIDEO व्हायरल
मात्र, अचानक १० वर्षांनी जिल्हा रुग्णालय येथे ही महिला आपल्या मुलाचा उपचार करण्यासाठी आली होती. यावेळी या परिसरात या महिलेला दाढी वाढलेली, फाटलेल्या कपड्यात, जखमी अवस्थेत एक व्यक्ती दिसला. या व्यक्तीवर तिची नजर गेली असता तिला हा व्यक्ती तिचा पती प्रेमचंद असल्याचे वाटले. यानंतर ती रडायला लागली आणि त्या व्यक्तीला तिने जवळ घेतले. १० वर्षांनी पती-पत्नीची भेट होत असल्याचे हे दृश्य पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. यावेळी याठिकाणी एकच गर्दी झाल्याचे पाहायला मिळाली होती.