गेल्या काही काळामध्ये आपण अनेक बातम्या अशा पाहिल्या आहेत, जिथे ऑनलाइन फसवणूक करणारा व्यक्ती समोरच्याला काहीही कळायच्या आत पैसे चोरून अक्षरशः गायब होतो. मात्र, मुंबईमधील तमन्ना नावाच्या एका मुलीने तिच्यासोबत घडणाऱ्या ऑनलाइन UPI स्कॅमला वेळीच ओळखून स्वतःचे ४५ हजार रुपये वाचवेल आहेत. तिने सोशल मीडियावर @itssynecdoche या अकाऊंटवर एक पोस्ट लिहून सर्व किस्सा नेटकऱ्यांसोबत शेअर केलेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिने लिहिलेल्या पोस्टनुसार, एका अनोळखी व्यक्तीने तिला फोन केला होता. ज्यामध्ये, तो तिच्या वडिलांना ओळखतो आणि त्यांच्याकडूनच हा नंबर मिळवल्याची माहिती देतो. नंतर त्या व्यक्तीला, तमन्नाच्या वडिलांना एलआयसीसाठी २५ हजार रुपये पाठवायचे असल्याचे सांगतो. मात्र, तिचे वडील जीपे [गूगल पे] वर नसल्याने तिच्या वडिलांनी त्यांच्या मुलीला पैसे पाठवण्यासाठी सांगितले आहे, असे सांगतो.

हेही वाचा : फेक फोनकॉल, AI निर्मित आवाज ओळखण्यासाठी ‘या’ चार टिप्स पाहा; स्कॅम्सपासून कसे सावध राहायचे पाहा…

सर्व माहिती तमन्नाने व्यवस्थित ऐकून घेतली. मात्र, तेव्हा तिला कुठल्याही गोष्टीची शंका आली नाही. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने तिला २० हजार रुपये पाठवले आहेत, असे सांगून फोन चालू असतानाच ते तपासण्यासाठी सांगितले. तमन्नानेदेखील अगदी घाईघाईने मेसेज पाहून, “हो आले आहेत” असे सांगितले. यावर तो व्यक्ती उरलेले पाच हजार रुपये पाठवतो म्हणून म्हणाला आणि पुन्हा तिला मेसेज आला आहे का विचारले. सर्व गोष्टी फोनवरील व्यक्ती अतिशय घाईघाईने करायला सांगत होता. दुसऱ्यांदा जेव्हा तमन्नाने मेसेज वाचला, तेव्हा मात्र तिला घडणाऱ्या सर्व प्रकारामध्ये काहीतरी गडबड आहे अशी शंका आली.

फोनवरील व्यक्तीने यावेळेस पाच हजारांऐवजी ५० हजार रुपये पाठवले होते, असे तमन्नाने फोनवरील माणसाला सांगताच, “अरे चुकून पाचऐवजी ५० हजार पाठवले. एक काम करा, त्यातले ४५ हजार मला तुम्ही परत पाठवा”, असे तिला सांगितले. आता मात्र तमन्नाला हा एक फेककॉल असल्याची खात्री पटली. तिने ताबडतोब फोनवरील व्यक्तीला, “मला केवळ मेसेज आला आहे पैसे जमा झालेले नाहीत” असे सांगितले आणि माझे वडील घरी आल्यानंतर मी तुम्हाला त्यांच्या नंबरवरून फोन करते आणि मग आपण ही सगळी गडबड त्यांच्यासमोरच निस्तरू; असे सांगताच समोरच्या व्यक्तीने पटकन फोन ठेऊन दिला, असे तिने तिच्या एक्स [ट्विटर] या सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत सांगतले आहे.

यासोबतच तिने तिला आलेल्या खोट्या एसएमएस आणि गूगल पेचा स्क्रीनशॉट आपल्या पोस्टमध्ये शेअर केला आहे. या पोस्टला आत्तापर्यंत २२०.५ K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman identified the online scams and take immediate action posts on x social media dha
Show comments