ऑनलाईन खरेदी करणे ही आता सामान्य गोष्ट आहे. आजकाल सर्वजण काही ना काही सोशल मीडियावरून मागवत असतात. पण एका महिलेला ऑनलाईन खरेदीचा भयानक अनुभव आला आहे ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने घरगुती उपकरणाची ऑनलाईन खरेदी केली पण त्याऐवजी तिला मृतदेह मिळाला. एवढंच नाही तर महिलेला १.३ कोटींची मागणी करणारे पत्रही मिळाले आहे. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आणि त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आणि पुढील तपासासाठी मृतदेह शवागारात पाठवला.
सागी तुलसी असे या महिलेचे नाव असून ती सरकारी वाटप केलेल्या भूखंडावर राहात असून आणि घर बांधत आहे. पण अहवालानुसार, तुलसीला अचानक एका परोपकारी व्यक्तीकडून मदत मिळू लागली. सप्टेंबरमध्ये, त्याने तिला उच्च दर्जाच्या टाइल्स आणि पेंट तिच्या घरी पाठवले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, “अज्ञात परोपकारी व्यक्तीने तिला मदत केल्याचा दावा केला कारण त्या दोघांची जात(caste) एकच होती आणि ती विधवा होती. उपकरणांचा अंदाज घेऊन, तुलसीने ते बॉक्स उघडले परंतु १.३ कोटी रुपयांच्या रकमेची मागणी करणाऱ्या खंडणी पत्रासह ४५ वर्षीय अज्ञात व्यक्तीचा कुजलेला मृतदेह सापडला जे पाहून ती घाबरली. चार ते पाच दिवसांपूर्वी या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समजते.
हेही वाचा –‘X’ वर हॅशटॅग वापरावे का? एलॉन मस्कने दिले उत्तर
अनेक वर्षांपूर्वी घेतलेल्या कर्जाच्या चक्रवाढ रकमेची मागणी या चिठ्ठीत असल्याचे मीडिया अहवालात सूचित केले आहे. यापुढे मागण्या मान्य न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पत्र खालीलप्रमाणे आहे, “म्हणून, जर तुम्हाला काही वाईट घडू इच्छित नसेल तर तुम्ही पैसे द्यावेत”.
जिल्हा पोलिस अधीक्षक, अदनान नईम अस्मी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, संदर्भित पॅकेज गुरुवारी रात्री एका ऑटोरिक्षामधून उंडी मंडलातील येंदागंडी गावात बांधकाम सुरू असलेल्या चार जणांच्या कुटुंबाला देण्यात आले.
एसपींनी सांगितले की ते गेल्या तीन ते चार दिवसांपासून बेपत्ता झालेल्या सर्व लोकांची तपासणी करत आहेत. पोलीस पोस्टमार्टमच्या निकालाचीही वाट पाहत आहेत. हा सगळा उलगडा होत असतानाच या कुटुंबातील लहान सून कालपासून बेपत्ता असल्याचीही नोंद पोलिसांनी घेतली आहे.
तुलसीचा पती १० वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता आणि तेव्हापासून तो सापडला नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तुलसी आता तिच्या आईवडिलांबरोबर राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुलसी सुरुवातीला तिच्या पालकांबरोबक राहत होती पण नंतर तिच्या आईवडिलांच्या निवासस्थानापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तिच्या घराचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी ती भाड्याच्या घरात राहायला गेली.
काही इतर मीडिया रिपोर्ट्समध्ये क्षत्रिय सेवा समितीलाही या प्रकरणात अडकवले आहे. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की,”समुदाय तुलसीला मदत करत होता आणि त्यांनीच तिला तिच्या नवीन घरासाठी उपकरणे पाठवण्याचे आश्वासन दिले होते. यापूर्वी त्यांनी तिला फरशाही पाठवल्या होत्या. समाजाच्या प्रतिनिधींनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.