तुम्ही जर सोशल मीडियावर सक्रिय असाल तर मोबाईल चाळताना एकदा तरी तुम्हाला ‘मनिके मगे हिथे’ या ट्रेडींग गाण्याचा व्हिडीओ डोळ्यासमोर आला असेल. हे गाणं सिंहली भाषेतलं असलं तरी भारतात मात्र या गाण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चाललंय. सिंगर योहानी हिने गायलेल्या या गाण्याचा ट्रेंड संपण्याचं नावच घेत नाहीये. बॉलिवूड कलाकारांपासून सोशल मीडिया यूजर्सपर्यंत प्रत्येकजण या गाण्यावर कुणी गाताना तर कुणी डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करत आहेत. सध्या असाच आणखी एक नवा व्हिडीओ व्हायरल होतोय. यात एक महिलेने ब्लॅक स्विमसूट आणि कलरफूल सारॉंग परिधान करत ‘मनिके मगे हिते’ गाण्यावर अफलातून डान्स केलाय. या व्हिडीओमध्ये महिलेचे डान्स मूव्ह्स पाहून नेटिझन्स खूपच खूश झाले आहेत.

आत्तापर्यंत तुम्ही कदाचित श्रीलंकन ​​गायिका योहानी डिलोका डी सिल्वाच्या ‘मनिके मागे हिते’ या गाण्याचे व्हायरल वर्जन ऐकले असतील, पाहिले असतील किंवा गायले असतील. हे गाणं जंगलातल्या एखाद्या आगीसारखा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पसरलं आहे आणि नेटिझन्स व्यतिरिक्त सेलिब्रिटींनी सुद्धा मनिके मागे हिते डान्स चॅलेंजमध्ये भाग घेतला आहे. आता याचाच साखळीतला एका नवा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. एका महिलेने ब्लॅक स्विमसूट आणि सारॉंग परिधान करून डान्स करत या गाण्याला बोल्ड टच दिलाय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, ब्लॅक स्विमसूट आणि कलरफूल सारॉंग परिधान केलेली एक महिला एका स्विमींग पूल शेजारी उभी असलेली दिसून येतेय. ‘मनिके मागे हिते’ या गाण्याच्या पेपी ट्रॅकवर ही महिला डान्स मूव्ह्स करताना दिसून येतेय. या व्हिडीओमधील महिलेचे डान्स मूव्ह्स पाहून पाहणारे केवळ पाहतच राहीले आहेत. यात या महिलेने इतका सुंदर डान्स केलाय की तिच्यासमोर बड्या अभिनेत्री देखील फेल ठरतील. या व्हिडीओमध्ये महिला बचाता डान्स स्टेप्स करताना दिसून येतेय. ‘बचाता’ डान्स हा साल्सासारखाच विदेशातला एक प्रसिद्ध डान्सचा प्रकार आहे. हा डान्स कॅरिबियन देशाप्रमाणेच इतर देशात लोकप्रिय आहे. उत्कटता, कोमलता आणि अप्रत्याशितता या विरोधाभासांचा मिलाफ असलेला हा अफलातून डान्स करणाऱ्या महिलेने नेटकऱ्यांचं मन जिंकलंय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमधील महिलेचं नाव प्रतीक्षा रेगे असं आहे. ब्लॅक स्विमसूट आणि कलरफूल सारॉंगमध्ये या महिलेने कामुकतेने आणि रोमॅण्टिक अंदाजाने सोशल मीडियावरील वातावरण चांगलंच तापवलंय. गोवामधल्या रिवा बीचवर या महिलेने हा व्हिडीओ शूट करत सोशल मीडियावर शेअर केलाय. प्रतिक्षा रेगे या महिलेने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून व्हिडीओ शेअर केलाय. त्यानंतर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. व्हिडीओमधील महिलेचे एक्सप्रेशन आणि डान्स मूव्ह्स पाहून सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे.

प्रतिक्षा रेगे ही पुण्याची असून एक प्रसिद्ध डान्सर सुद्धा आहे. तिने कथ्थकमध्ये मास्टर्स डिग्री मिळवली असून ती बचाता आणि साल्सा डान्सची चाहती आहे. ती तिच्या इन्स्टाग्रामवर सक्रीय असून वेगवेगळ्या प्रकारच्या डान्सचे वेगवेगळे व्हिडीओ ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करत असते. नुकतंच ‘मनिके मागे हिते’ या गाण्यावरील बचाता डान्सच्या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिलंय. तर तिच्या डान्सच्या अदा पाहून नेटिझन्सने व्हिडीओखालील कमेंट्स सेक्शनमध्ये तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय.

‘मनिके मागे हिते’ सतीशन रत्नायक यांचं गाणं आहे. मात्र, या गाण्याचं योहानी डिलोका डिसिल्वा हिच्या आवाजातील फिमेल व्हर्जन लोकांच्या पसंतीस उतरत आहे. या गाण्याचे बोल ड्यूलन ए आर एक्सने लिहिले आहेत. आतापर्यंत या गाण्याला १७८ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Story img Loader