आपल्या चुकांवर पांघरून घालणारी, आपल्याला उभं राहण्यासाठी बळ देणाऱ्या आईची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही. सोशल मीडियावर दररोज आई आणि मुलाच्या नात्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ आपल्या मनात घर करुन राहतात. तर काही वेळा अशा घटना समोर यतात की त्यावर विश्वास ठेवणंही कठीण होतं. सध्या अशीच एक घटना संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना भारतातील नसून चीनमधली आहे मात्र तरीही ऐकून प्रत्येकाच्या अंगावर काटा येत आहे. एका महिलेने तिच्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला चक्क कचऱ्यात फेकून दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माता न तू वैरिणी!

चीनमध्ये राहणारी ही महिला कुठेतरी फिरायला गेली होती, जिथे तिला लिफ्टमध्येच प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि त्यानंतर तिने हे धक्कादायक कृत्य केले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यावेळी ती तिच्या सामानासह लिफ्टमध्ये प्रवेश करते. काही सेकंदांनंतर, ती खाली वाकते आणि नवजात बाळाला जन्म देते. यानंतर ती नवजात बाळाला टिश्यू पेपरने पुसते. यासोबतच ती तिच्या कपड्यांवरील आणि लिफ्टमधील रक्तही पुसते. यादरम्यान लिफ्टमध्ये कोणी आले की ती मुलाला लपवते. मग ती सामान घेऊन बाहेर येते आणि टिश्यू पेपरमध्ये गुंडाळलेल्या मुलाला डस्टबिनमध्ये टाकते.

हेही वाचा – जगातील सर्वात महागडं चीज! फक्त एक तुकडाच २७ लाखांना विकला, जाणून घ्या सविस्तर

काळीमा फासणारी घटना व्हायरल

महिलेला हे करताना पाहून एक महिला तिथे जाऊन डस्टबीनमध्ये काय आहे हे पाहते पण तिला मूल सापडत नाही. दरम्यान सुदैवाने मुलाचा जीव वाचला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर त्या महिलेने बाळाला ताब्यात घेतले आहे. मात्र या घटनेनं अनेकांना धक्का बसला आहे. एक आई आपल्या नवजात बाळाबरोबर असं कसं करु शकते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सोशल मीडियावरही नेटकरी या महिलेवर संतापले असून तिच्यावर टीका करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman in china drops newborn in rubbish bin after giving birth in lift is later given baby back crime news srk