युक्रेनवर रशियाने आक्रमण केल्यानंतर तिथले अनेक अस्वस्थ कऱणारे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही फोटो, व्हिडीओजमधून या युद्धामुळे उध्वस्त होणाऱ्या नागरिकांची करुण कथा पाहायला मिळत आहे, तर काही मात्र नागरिकांच्या धैर्याचा, शौर्याचा गौरव करणारे आहेत. असाच एक हृदय पिळवटून टाकणारा व्हि़डीओ सध्या सोशल मी़डियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या महिलेचा हा व्हिडीओ पाहून आपल्याला कुसुमाग्रजांची ‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा’ ही कविता आठवल्याशिवाय राहणार नाही. असं काय आहे या व्हिडीओमध्ये? या व्हिडीओत एक युक्रेनियन महिला आपलं बॉम्बहल्ल्यामध्ये उध्वस्त झालेलं घर सावरताना दिसत आहे. घरात इतस्ततः पडलेल्या काचा ती उचलताना दिसत आहे. आणि हे करता करता ती युक्रेनचं राष्ट्रगीत गात आहे. ही महिला युक्रेनची राजधानी कीव इथली असल्याचं सांगितलं जात आहे.

रशियाच्या आक्रमणाविरुद्ध आता युक्रेनच्या सामान्य नागरिकांनीही कंबर कसली आहे. युक्रेनमध्ये १,९६,००० सक्रिय लष्करी कर्मचारी आहेत, तर व्लादिमीर पुतिन यांच्या रशियात सुमारे ९,००,००० सक्रिय लष्करी कर्मचारी आणि दोन दशलक्ष राखीव कर्मचारी आहेत. तरीसुद्धा, युक्रेनियन लोक हार मानण्यास नकार देत आहेत शस्त्रे उचलत आहेत, त्यांच्या बागांमध्ये मोलोटोव्ह कॉकटेल बनवत आहेत.

युद्धविषयक ताज्या अपडेट्ससाठी येथे क्लिक करा.

हे मोलोटोव्ह कॉकटेल म्हणजे कोणता खाण्यापिण्याचा पदार्थ नसून हे पेट्रोल बॉम्ब आहेत जे तुलनेने सहज बनवता येतात. काचेची बाटली ज्यामध्ये पेट्रोल किंवा अल्कोहोलसारखे कोणतेही ज्वलनशील पदार्थ लक्ष्यावर आग लावण्यासाठी वापरले जाते ते म्हणजे मोलोटोव्ह कॉकटेल.