Viral news: आपल्या सगळ्यांनाच असं वाटतं की, एखादी गोष्ट मनात यावी आणि ती पटकन व्हावी. मग ते काहीही असो; मला अमुक अमुक खावंसं वाटतंय आणि ते आता लगेच माझ्यासमोर यावं. मला फिरायला जायचंय आणि मला कुणीतरी त्या ठिकाणी नेऊन ठेवावं. किंवा अगदी ट्रॅफिकमध्ये अडकल्यावरही असं वाटतं की, आपल्याला पंख असते, तर उडत उडत पोहोचलो असतो. किंवा एखादं हॅलिकॉप्टर असतं, तर ट्रॅफिकची समस्याच उदभवली नसती. मात्र, हे कोणत्या जादूनं शक्य नाहीये. प्रत्यक्षात हे फक्त प्रचंड पैसे असल्यास आपल्याला वाटेल तेव्हा आपण करू शकतो. दरम्यान, न्यू यॉर्कमध्ये राहणाऱ्या एका भारतीय तरुणीनं शहरातील ट्रॅफिकवर मात करण्यासाठी असं काही केलं की, तुम्ही विचारही करू शकत नाही.

ट्रॅफिकमधून वाचण्यासाठी तरुणीनं काय केलं पाहा

ट्रॅफिकमधून वाचण्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय शोधत असतात; मात्र या तरुणीनं उबर टॅक्सीचा पर्याय न निवडता, चक्क हेलिकॉप्टरच बुक केलं. तिनं या बुकिंगचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून, सध्या या तरुणीच्या श्रीमंतीची सर्वत्र चर्चा सुरू आहे. क्लीनर पर्किन्स येथील कर्मचारी खुशी ही सुरी मॅनहॅटन ते क्वीन्स येथील जॉन एफ केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्याचा विचार करीत होती. तिच्याकडे दोन पर्याय होते, एक तासाची उबर राइड आणि पाच मिनिटांची हेलिकॉप्टर ट्रिप. यावेळी दोन वाहतूक पर्यायांमधील फरक आणि हेलिकॉप्टर राईडसाठी लागणाऱ्या खर्च व लागणाऱ्या वेळेचा हिशेब तिनं मांडला आहे. खुशीची पोस्ट वाचून सर्व जण तिच्या बुद्धीचं कौतुक करतायत. खुशीनं सोशल मीडिया एक्सवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

तिनं हेलिकॉप्टरमधून प्रवास करण्यासाठी आणि उबरमधून प्रवास करण्यासाठी किंमत आणि वेळेची तुलना करणारा एक स्क्रीनशॉटदेखील पोस्ट केला. उबर राइडसाठी तिला एका तासासाठी $१३१.९९ म्हणजेच भारतीय रुपयांत ११,००० रुपये इतकी किंमत मोजावी लागेल; पण त्याच मार्गासाठी ब्लेड हेलिकॉप्टर राइडची किंमत पाच मिनिटांसाठी $१६५ म्हणजेच भारतीय रुपयांत १३,७६५ इतकी किंमत मोजावी लागेल. म्हणजे फरक केवळ दोन हजार रुपयांचा होता आणि त्यातही ती केवळ पाच मिनिटांत पोहोचणार होती.

पाहा पोस्ट

हेही वाचा >> VIDEO: एका क्षणाचा राग सगळं उद्ध्वस्त करतो! चिपळूणमध्ये पाण्याची बाटली वेळेवर न मिळाल्याने पाहा तरुणाने काय केले…

तिचे हे ट्वीट व्हायरल झाले असून चार दक्षलक्ष लोकांनी हे पाहिलं असून, नेटकरी यावर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, ”हे खरं आहे का? मला प्रामाणिकपणे फक्त हेलिकॉप्टरमध्ये बसायचं आहे.” दुसऱ्यानं टिप्पणी केली, ‘बस्स! एवढं श्रीमंत व्हायचंय” काहींनी तिच्यावर टीकाही केली आहे; तर अनेकांनी तिच्या निर्णयाचं कौतुक केलंय.