तुमच्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला काही स्पेशल गिफ्ट द्यायचं असेल तर त्या व्यक्तीच्या नावाचा टॅटू काढण्यापेक्षा आणखी काय स्पेशल गिफ्ट असू शकतं. आजकाल ‘कपल टॅटू’चा ट्रेंड सुरू आहे. अनेकजण आपल्या पत्नी, प्रेयसी, पती, प्रियकर यांच्या नावाचा टॅटू काढतात. पण म्हातारपण अनुभवणाऱ्या आजी-आजोबांच्या नावाचा टॅटू काढणाऱ्या एका तरूणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आजोबा आणि नात यांच्यामधली ही बॉण्डिंग पाहून तुम्ही सुद्धा भावूक व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरूणी तिचा टॅटू तिच्या आजी-आजोबांना दाखवतेय. तिने पायाच्या घोट्यावर काढलेल्या टॅटूमध्ये काय विशेष आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तिने तिच्या पायाच्या घोट्यावर आजी-आजोबांच्या नावांचा टॅटू काढलाय आणि ते पाहून ते आजोबा भावूक झाले. आपल्या नातीने आपल्या नावाचा टॅटू काढलेला पाहून आजोबांनी सुरूवातीला भावनांवर नियंत्रण राखण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी त्यांचं भावनेवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरंगताना पाहून नातीनेही त्यांना एक घट्ट मिठी मारत त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. आजोबा आणि नातीमधलं हे प्रेम पाहून अनेकांचे डोळे पाणावले.
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : भरधाव ट्रकने गेंडयाला धडक दिली, ट्रक चालक पसार, पाहा धक्कादायक घटनेचा VIRAL VIDEO
हा व्हिडीओ GoodNewsCorrespondent नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय. हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात पाहत असून तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर देखील शेअर करू लागेल आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १४ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी या व्हिडीओला लाईक करत आपल्या वेगवेगळ्या भावना व्यक्त केल्या आहेत.